अखिल भारतीय आंतर विभागीय टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप
नगरोटा बागवान : गोवा ज्युनियर गर्ल्सने सुपर लीग गटात अव्वल स्थान पटकावले आणि विजेतेपद मिळवण्यासाठी ते आता फक्त एका सामन्यापासून दूर आहेत, तर गोवा ज्युनियर बॉईजने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
स्पर्धेतील गोव्या मुलींचा तिसरा सामना हिमाचल प्रदेशसोबत झाला. प्रथम फलंदाजी करताना गोव्याने ६ षटकांत ३ बाद ७५ धावा केल्या. तनया गावडेने २०, तनिष्का गावडेने २५, राखी गिरीने १० तर आयुषी श्रीवास्तवने नाबाद १२ धावा केल्या.
प्रत्युत्तरात हिमाचल प्रदेशने ६ षटकांत ६ बाद ४५ धावा केल्या. गोव्याच्या अंतरा नाईकने १२ धावांत २, स्नेहल वेलिंगकर, हौशी गावडे, प्राची गावडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. गोव्याने हा सामना ३० धावांनी जिंकला.
चौथा सामना उत्तर प्रदेशसोबत झाला. प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशने ६ षटकांत ५ बाद ४८ धावा केल्या. गोव्यातर्फे संध्या रायने १२ धावांत २, तर प्रतिक्षा केरेकर, परिधी गावडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात गोव्याने ५.४ षटकांत ४ गडी गमावून ५० धावा केल्या. पूर्वा गावडेने २०, संध्या रायने १२, तर दिव्या सातारकरने १० धावांचे योगदान दिले. गोव्याने हा सामना ४ गडी राखून जिंकला.
गोव्याच्या मुलांचा अंतिम लीग सामना हरियाणाविरुद्ध झाला. प्रथम फलंदाजी करताना गोव्याने ६ षटकांत ५ बाद ५४ धावा केल्या. शौर्य नाईकने १५, आर्यन नाईकने १२, वेदांत पागी आणि आदित्य नाईकने प्रत्येकी १० धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरात हरियाणाने ६ षटकांत ६ बाद ४२ धावा केल्या. पुंडलिक भामाईकरने १३ धावांत २, तर वंश बोरकर, शौर्य तारी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. गोव्याने हा सामना १२ धावांनी जिंकला.
उर्वरित सामने २ जूनपासून
गोव्याच्या मुलींनी सर्व सामने जिंकून सुपर लीग गटात अव्वल स्थान पटकावले आहे आणि आता गटातील एका सामन्यानंतर अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याची त्यांची शक्यता आहे. गोव्या मुलांच्या संघाने सर्व लीग सामने जिंकून आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सर्व उर्वरित सामने २ जून रोजी सकाळी ९ वाजता खेळले जातील.