🏏 पणजी : रवळनाथ स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबने आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मडगाव येथील घुमटेश्वर संघाने पटकावले. घोडकादेव नगर, कुंडई येथे आयोजित या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वझरी पेडणे येथील रिद्धी वॉरियर्स संघाने उपविजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्याच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी वीजमंत्री सुदिन ढवळीकर, माधवराव ढवळीकर ट्रस्टचे मिथिल ढवळीकर, उद्योजक बाबू तथा लक्ष्मण रायकर, गोवा क्रिकेट संघटनेचे माजी सचिव अनंत नाईक, दुर्गाकुमार नावती, सरपंच सर्वेश जलमी, पंच सदस्य मनीषा कुंडईकर, विश्वास फडते, विष्णुदास फडते, माजी सरपंच उत्तम नाईक, रामू नाईक, आयोजन प्रमुख मिथुन वैद्य आणि गौरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
🏟️ कुंडई गावातील क्रीडापटूंसाठी सर्वसोयीयुक्त मैदान उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच, खेळाडूंसाठी सर्व प्रकारच्या सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आश्वासनही, यावेळी बोलताना मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिले.
खेळाडूंसाठी मैदान उपलब्ध करून देणार!
🏆 विजेत्यांना लाखोंची बक्षिसे 💰
🏆 विजेता संघ
घुमटेश्वर संघ
१,७७,७७७/- रुपये + चषक
🥈 उपविजेता संघ
रिद्धी वॉरियर्स
७७,७७७/- रुपये + चषक
🥉 उपांत्य फेरी विजेते
निरंकाल, आई शांतादुर्गा, तुवी क्रिकेटर्स
प्रत्येकी १७,७७७/- रुपये + चषक
⭐ वैयक्तिक बक्षीस विजेते
• मतीन खान (घुमटेश्वर) : मालिकावीर
• आकाश नाईक (रिद्धी वॉरियर्स) : उत्कृष्ट गोलंदाज
• प्रथमेश नाईक (आई शांतादुर्गा) : उत्कृष्ट फलंदाज
• संकेत कोरगावकर (घुमटेश्वर) : अंतिम सामन्यातील सामनावीर
• चित्रा (ऑटोटेक, पणजी) : उत्कृष्ट क्षेत्ररक्षक
• गणपती वॉरियर्स (बांदोडा) : शिस्तबद्ध संघ
या स्पर्धेचे समालोचन निलेश नाईक, बाबल पालेकर आणि श्याम कळंगुटकर यांनी केले, तर मैदानी पंच म्हणून पुण्या पालकर, रुपेश नाईक आणि प्रज्योत फडते यांनी काम पाहिले.