आज मुंबई विरुद्ध पंजाब क्वालिफायर २ : अहमदाबाद येथे रंगणार सामना
अहमदाबाद : मुंबई इंडियन्सने ३० मे रोजी मुल्लानपूरमधील स्टेडियममध्ये झालेल्या आयपीएल २०२५ एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सवर २० धावांनी विजय मिळवत क्वालिफायर-२ मध्ये धडक दिली. त्यामुळे आता अंतिम फेरीसाठी क्वालिफायर २ सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
हा सामना १ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत ट्रॉफीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दोन हात करेल.आयपीएलच्या १८ व्या मोसमात गुरुवारी २९ मे रोजी क्वालिफायर १ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळरुने पंजाब किंग्सवर ८ गड्यांनी एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली. आरसीबीची फायनलमध्ये पोहचण्याची २०१६ नंतरची पहिलीच वेळ ठरली. तर पंजाब पहिल्या फेरीत फायनलमध्ये पोहचण्यात अपयशी ठरली. मात्र पंजाब साखळी फेरीत पहिल्या स्थानी राहिली. त्यामुळे पंजाबला फायनलमध्ये पोहचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. त्यानुसार एलिमिनिटेर जिंकणाऱ्या संघाविरुद्ध पंजाबचा सामना होणार आहे. एलिमिनेटरचा निकाल लागल्याने पंजाबसमोर मुंबईचे आव्हान असणार आहे.
पंजाब विरुद्ध मुंबई दुसऱ्यांदा आमनेसामने
क्वालिफायर २ निमित्ताने पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांची या १८ व्या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. याआधी दोन्ही संघ २६ मे रोजी आमनेसामने आले होते. तो दोन्ही संघांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना होता. पंजाबने त्या सामन्यात मुंबईवर मात करत टॉप २ मध्ये प्रवेश मिळवला होता. पंजाबला त्या विजयामुळेच अंतिम फेरीत पोहचण्याची १ अतिरिक्त संधी मिळाली. मात्र आता त्याच मुंबई विरुद्ध पंजाबची गाठ असणार आहे.मुंबई आणि पंजाबची साखळी फेरीतील कामगिरीदरम्यान मुंबईपेक्षा पंजाब किंग्सने १८ व्या मोसमात साखळी फेरीत दमदार कामगिरी केली. पंजाबने १४ पैकी ९ सामने जिंकले. तर पंजाबला ४ वेळा पराभूत व्हावे लागले. तसेच पंजाबचा १ सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे पंजाबच्या खात्यात १९ गुण होते. तर पंजाबचा नेट रनरेट हा साखळी फेरीनंतर +०.३७२ असा होता.मुंबईची कामगिरीतर दुसऱ्या बाजूला मुंबईने पंजाबच्या तुलनेत १ सामना कमी जिंकलाय. मात्र मुंबईचा नेट रनरेट इतर सर्व संघाच्या तुलनेत चांगला आहे. मुंबईने साखळी फेरीतील १४ पैकी ८ सामने जिंकले. तर पलटणला ६ वेळा पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा १६ गुणांसह नेट रनरेट हा +१.१४२ असा होता.
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या ३३ सामन्यांमध्ये, मुंबईने १७ सामने जिंकले आहेत, तर पंजाबने १६ सामने जिंकले आहेत. म्हणजे दोन्ही संघांमध्ये हेड-टू-हेड रेकॉर्ड जवळपास बरोबरीत आहे, आणि कोणताही संघ स्पष्टपणे वरचष्मा गाजवत नाही.
हेड-टू-हेड रेकॉर्ड:
एकूण सामने : ३३
मुंबई जिंकले: १७
पंजाब जिंकले: १६
पंजाबचे सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:
खेळाडू सामने धावा सरासरी सर्वाधिक धावसंख्या
प्रभसिमरन सिंग १६ ५६७ ३७.८० ९१
श्रेयस अय्यर १६ ५१६ ४६.९१ ९७*
प्रियांश आर्य १६ ५०१ ३१.३१ १०३
नेहल वढेरा १५ ३०६ ३०.६० ७०
शशांक सिंग १६ २८७ ४७.८३ ५९
मुंबईचे सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:
खेळाडू सामने धावा सरासरी सर्वाधिक धावसंख्या
सूर्यकुमार यादव १५ ६७३ ६७.३० ७३*
रोहित शर्मा १४ ४१० २९.२८ ८१
रायन रिकेल्टन १४ ३८८ ३०.०८ ६२*
तिलक वर्मा १५ २९९ ३७.३७ ५९
विल जॅक्स १३ २३३ २१.१८ ५३
पंजाब किंग्ससाठी आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज:
आर्शदीप सिंह – १८ बळी
मार्को यान्सेन – १६ बळी
युझवेंद्र चहल – १४ बळी
हरप्रीत ब्रार – १० बळी
मुंबईसाठी सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
ट्रेंट बोल्ट : २१
जसप्रीत बुमराह : १८
हार्दिक पांड्या : १३
दीपक चहर : ११