🏏 पणजी : हिमाचल प्रदेशमधील नागरोटा बागवान होणाऱ्या अखिल भारतीय आंतर-विभागीय टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिपसाठी गोव्याच्या कनिष्ठ (मुले आणि मुली) संघांची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धा ३१ मे ते २ जून २०२५ दरम्यान होणार आहे.
✈️ या संघांचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून निलेश नाईक, हरेश पार्सेकर, अजिंक्य नाईक आणि क्षितिज देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवड झालेले खेळाडू आणि अधिकारी २८ मे रोजी मडगाव रेल्वे स्थानकावरून हिमाचल प्रदेशसाठी रवाना होतील आणि ६ जून रोजी रेल्वेने परत गोव्यात येतील.
मुलांचा संघ
• शौनक नाईक
• वेदांत पागी
• शौर्य गावडे
• सार्थक सतरकर
• चिन्मय केरेकर
• शौर्य तारी
• सौरभ गावडे
• पुंडलिक भामईकर
• वंश बोरकर
• आदित्य नाईक
• रुणाल मुळी
• साईश नाईक
• सोनम कळंगुटकर
• आर्यन नाईक
मुलींचा संघ
• प्रतीक्षा केरकर
• आयुषी श्रीवास्तव
• अंतरा नाईक
• राखी गिरी
• पूर्वा गावडे
• तनया गावडे
• तनिष्का गावडे
• प्राची गावडे
• स्नेहल वेलिंगकर
• हाऊशी नाईक
• परिधी गावडे
• संध्या राय
• रिया पाटील
• दिव्या सतरकर
🏆 या संघांना शिरोडा पंचायत हॉल, शिरोडा येथे अधिकृत निरोप देण्यात आला. यावेळी जलस्रोत मंत्री तथा शिरोडा मतदारसंघाचे आमदार सुभाष शिरोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत शिरोडा पंचायतीच्या सरपंचा मुग्धा शिरोडकर, बोरी पंचायतीचे सरपंच जयेश नाईक, पंच सदस्य, संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.