गोव्याच्या संस्कृतीसाठी योगदान द्या : तानावडे

मये महोत्सवाचे उदघाट्न : कमलाकांत तारी यांना ‘मयेरत्न’ प्रदान


25th May, 12:36 am
गोव्याच्या संस्कृतीसाठी योगदान द्या : तानावडे

कमलाकांत तारी यांना ‘मयेरत्न’ देऊन गौरवताना खासदार सदानंद शेट तानावडे. सोबत आमदार प्रेमेंद्र शेट, रूपेश ठाणेकर, दयानंद कारबोटकर, महेश सावंत व इतर.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : गोव्याची संस्कृती टिकवून ठेवणे गरजेचे आहे. आमची परंपरा, रूढी, लोककला लोप पावत असताना नव्या पिढीने जुन्या पिढीकडून हा वारसा आत्मसात करावा. संस्कृतीचा वारसा टिकवण्यासाठी मये महोत्सवासारखे सांस्कृतिक उत्सव नियमित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केले.
रायझिंग युथ मये, कला आणि संस्कृती खाते, श्री विजयानंद ज्ञान प्रसारक संस्था आणि श्री महामाया हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने तिसऱ्या मये महोत्सवाचे सिकेरी येथील गो शाळेत आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खासदार तानावडे बोलत होते. व्यासपीठावर आमदार प्रेमेंद्र शेट, अध्यक्ष रूपेश ठाणेकर, सरपंच कृष्णा चोडणकर, दयानंद कारबोटकर, जिल्हा पंचायत अध्यक्ष शंकर चोडणकर, महेश सावंत, सिल्वनो परेरा, सुभाष पार्सेकर, सिद्धेश पार्सेकर, वर्षा गडेकर, शांबा पेडणेकर, मोहनदास गावकर आदी उपस्थित होते.
आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले, गोमातेच्या भूमीत मये महोत्सव होणे ही पर्वणी आहे. यामुळे कलाकारांना उत्तम व्यासपीठ मिळाले असून बाल, युवा, ज्येष्ठ कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. शिक्षक सामाजिक संस्थानी युवा पिढीला योग्य दिशा दाखवावी. पुरातन कला नव्या पिढीने जोपसाणे गरजेचे आहे.
महोत्सवात सिकेरी गोशाळेचे कमलाकांत तारी यांना ‘मयेरत्न’ हा मानाचा पुरस्कार खासदार सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी विविध क्षेत्रांत योगदान दिलेले विजय मांद्रेकर, सुनील पिळगावकर, सावळो चोडणकर, रवींद्र धुरी यांचाही सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींच्या वतीने कमलाकांत तारी यांनी मनोगत व्यक्त केले.
आयोजन समितीचे अध्यक्ष रूपेश ठाणेकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन रूपेश लिंगूडकर यांनी केले. मयूर प्रभुगावकर यांनी आभार मानले. नंतर गोव्याच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणाऱ्या लोककला सादर करण्यात आल्या.

हेही वाचा