चिकन ग्रील्ड सँडविच

Story: चमचमीत रविवार |
25th May 2025, 02:56 am
चिकन ग्रील्ड सँडविच

साहित्य  :

२ कांदे (बारीक चिरून)
२०० ग्रॅम उकडलेले चिकन (बारीक करून)
२ चमचे लसूण (बारीक कापून)
पाव चमचा काळी मिरी पावडर
पाव चमचा चिली फ्लेक्स
पाऊण कप उकडलेले मक्याचे दाणे
२ चमचे ओरिगानो
२ चमचे चिकन स्टॉक (चिकन उकडताना उरलेले पाणी)
अर्धा चमचा जिरे पावडर
एक ढोबळी मिरची (चिरलेली)
अर्धा कप दही
बटर
चवीनुसार मीठ
ब्रेड स्लाईस

कृती :

एका पातेल्यात थोडे तेल घालून कांदा परतून घ्यावा. त्यात काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स, जिरे पावडर, उकडलेले मक्याचे दाणे, उकडलेले चिकन तुकडे बारीक करून परतून घ्यावे. कोरडे वाटल्यास चिकन स्टॉक घालावा. दही घालावे. आणखी वरुन ओरिगानो घालावे. सगळे छान परतून घ्यावे. चवीनुसार मीठ घालून मिश्रण मऊसर शिजवून घ्यावे. शेवटी चिरलेली ढोबळी मिरची घालावी. ब्रेड स्लाईसला बटर लावून त्यात हे मिश्रण भरावे. वर दुसरा ब्रेड स्लाईस लावून सँडविच ग्रील करून घ्यावे.


- कविता आमोणकर