डिचोली उपजिल्हाधिकारी, मामलेदारांची कारवाई
डिचोली : उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांनी शुक्रवारी सायंकाळी उसप लाटंबार्से येथे एका चिरेखाणीवर छापा टाकून मशिनरी जप्त केली.
उसप येथे चिरेखाण सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर डिचोलीचे उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांनी तेथे छापा टाकला. यावेळी दोन मशिनरी व इतर सामान जप्त करण्यात आले. सदर ठिकाणी विनापरवाना खाण सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.