आज नेटफ्लिक्सवर दाखल होणार ‘द रॉयल्स’
आज नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि इतर आेटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन चित्रपट मालिका झळकणार आहेत. यामध्ये इशान खट्टर आणि भूमी पेडणेकर अभिनीत रोमँटिक कॉमेडी द रॉयल्सपासून ते अमोल पराशर आणि विनय पाठक यांच्या वैद्यकीय मालिका ‘ग्राम चिकित्सालय’ यांचा समावेश आहे.
द रॉयल्स । नेटफ्लिक्स
ईशान खट्टर आणि भूमी पेडणेकर अभिनीत, ही कथा प्रिन्स अवीराज सिंग आणि सोफिया शेखर यांच्यावर आधारित आहे. जेव्हा अवीराजचे राजघराणे त्यांच्या कुटुंबाचा वारसा पुनर्संचयित करण्यासाठी सोफियाला कामावर ठेवते. तेव्हा दोघांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम उत्पन्न होते. या चित्रपटात झीनत अमान, मिलिंद सोमण, साक्षी तंवर आणि नोरा फतेही यांचा समावेश आहे.
ग्राम चिकित्सालय । अमेझॉन प्राइम व्हिडिओ
ही पाच भागांची ही मालिका शहरातील डॉक्टर डॉ. प्रभात यांच्यावर आधारीत आहे. ज्यांना भाथकांडी या दुर्गम गावात एका बंद पडलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सोपवण्यात येते. डॉ. प्रभात यांना गावकऱ्यांसाठी आरोग्य सेवा उभारण्यासाठी कोणकाेणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते, ते या मालिकेत दाखविण्यात आले आहे. या मालिकेत अमोल पराशर, विनय पाठक, आकाश मखीजा आणि आकांक्षा रंजन कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
पोकर फेस सीझन २ । जिओहॉटस्टार
पोकर फेसचे निर्माते त्यांच्या क्राइम कॉमेडी ड्रामाचा नवीन भाग घेऊन परतले आहेत. ज्यामध्ये चार्ली केल या कॅसिनो कर्मचारीची कथा पुढे सरकणार आहे. जी कसिनोतील गुन्हेगारी प्रकरणे सोडवण्यासाठी आपल्या कौशल्यांचा वापर करते.
नोनास । नेटफ्लिक्स
हा विनोदी चित्रपट स्कारावेला नावाच्या व्यक्तीच्या जिवनावर आधारीत आहे. ताे आई आणि आजीला गमावल्यानंतर त्यांच्या रेसिपी घेऊन इटालियन रेस्टॉरंट उघडतो. या चित्रपटात विन्स वॉन आणि सुसान सारँडन यांच्या प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे.
लॉन्ग वे होम । अॅपल टीव्ही+
लाँग वे होम ही १० भागांची मालिका आहे. जी इवान मॅकग्रेगर आणि चार्ली बूरमनवर केंद्रित आहे, जे स्कॉटलंड (मॅकग्रेगरचे घर) ते इंग्लंड (बूरमनचे निवासस्थान) असा साहसी प्रवास विंटेज बाईकवर करतात.
कॉनन ओ'ब्रायन मस्ट गो : सीझन २ - जिओहॉटस्टार
करिश्मा शेट्टी यांनी लिहिलेलेअमेरिकन टेलिव्हिजन होस्ट आणि कॉमेडियन कोनन ओ'ब्रायन यांच्या जिवनावर आधारीत ही मालिका आहे. ज्यामध्ये जेव्हियर बार्डेम आणि तैका वैतीती यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
बोहुरुपी । झी५
शिबोप्रसाद मुखर्जी आणि नंदिता रॉय दिग्दर्शित, बंगाली अॅक्शन थ्रिलर चित्रपटात बिक्रमची कथा दाखविण्यात आली आहे. एका प्रामाणिक मिल कामगाराला हत्येच्या आरोपाखाली चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्यात येते. जेव्हा त्याला न्याय मिळत नाही, तेव्हा तो गुन्हेगारीकडे वळतो, वेगवेगळ्या वेशभूषा करून बँका लुटतो.
भूल चुक माफ - थिएटर
करिश्मा शेट्टी यांनी लिहिलेला‘भूल चुक माफ’ हा एक मनोरंजक विनोदी चित्रपट आहे ज्यामध्ये राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही कथा रंजन नावाच्या एका तरुणाची आहे, जो त्याच्या लग्नाच्या काही दिवस आधी हळदी समारंभाच्या दिवशी एका रहस्यमय वेळेच्या चक्रात अडकतो.
शॅडो फोर्स । थिएटर
केरी वॉशिंग्टन आणि ओमर साय अभिनीत, हा अॅक्शन-पॅक्ड थ्रिलर चित्रपड एका विभक्त झालेल्या जोडप्याभोवती फिरतो, जे पुन्हा एकत्र येतात आणि त्यांच्या लहान मुलाला त्यांच्या माजी एजन्सी शॅडो फोर्सपासून वाचवण्यासाठी भूमिगत होतात.