🏆पणजी : एमआयबीके हायस्कूल, खांडेपार संघाने
१४ वर्षांखालील प्रेसिडेंट कप दक्षिण विभाग २०२४-२५ च्या अंतिम सामन्यात भाटीकर मॉडेल हायस्कूलवर
१० गडी राखून दणदणीत विजय मिळवून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
🏏हा सामना एमसीसी मैदान, मडगाव येथे पार पडला.
📊भाटीकरने प्रथम फलंदाजी करताना ३१.४ षटकांत ११५ धावा केल्या. 👏आर्यन चौगुले (३०), विहान कोळंबकर (१६) आणि संच नाईक (१०) यांनी काही धावा केल्या. 🔥एमआयबीकेकडून निलेश घर्तीने ७ षटकांत ३४ धावांत ३ बळी घेतले, तर वेदांग गावडेने ८ षटकांत १९ धावांत २ बळी घेतले.
💪प्रत्युत्तरदाखल खेळताना एमआयबीकेने एकही गडी न गमावता ११६ धावा करत सामना १० गडी राखून जिंकला. 🌟शौर्यने ५७ (५९ चेंडू) आणि तनय परबने ५० (६६ चेंडू) धावा करत चमकदार खेळी केली.
🎉विजयी संघाचा गौरव जीसीएचे संयुक्त सचिव रुपेश नाईक व सचिव शांबा देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 👏त्यांनी संघाच्या दमदार कामगिरीचे कौतुक केले.