गुन्ह्याची कबुली देत मागितली माफी : सर्व प्रकारच्या क्रिकेटपासून रहावे लागणार दूर
अहमदाबाद : गुजरात टायटन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याच्या आयपीएल २०२५ च्या मध्यावर अचानक अफ्रिकेला परत जाण्याने चर्चेला उधाण आले होते. त्यावेळी वैयक्तिक कारणास्तव त्याने स्पर्धा सोडल्याचे सांगितले गेले. मात्र आता एक मोठा खुलासा झाला आहे. रबाडाचा डोप टेस्ट पॉझिटिव्ह आला असून, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर स्थायी निलंबनाची कारवाई केली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील टी २० लीगमध्ये खेळत असताना रबाडाची डोप टेस्ट करण्यात आली होती. आता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे त्याला केवळ आयपीएलच नव्हे, तर सर्व प्रकारच्या क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे.
रबाडाची प्रतिक्रिया
मी सध्या क्रिकेट बोर्डाच्या निलंबनाचा सामना करत आहे आणि याबद्दल मी सर्व चाहत्यांची माफी मागतो. मी सर्वांना खात्री देतो की, भविष्यात अशी कोणतीही चूक होणार नाही, ज्यामुळे मला खेळापासून दूर राहावे लागेल.
रबाडाची आयपीएल कारकीर्द
कगिसो रबाडा याने आयपीएलमध्ये एकूण ८२ सामन्यांमध्ये ११९ बळी घेतले आहेत. त्याची सरासरी २२.२९ आणि इकॉनॉमी रेट ८.५३ इतकी प्रभावी राहिली आहे. रबाडाने आयपीएल कारकिर्दीची सुरुवात २०१७ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून केली होती. त्यानंतर पंजाब किंग्ससाठीही महत्त्वपूर्ण कामगिरी केली. आयपीएल २०२५ च्या लिलावात गुजरात टायटन्सने त्याला तब्बल १०.७५ कोटी रु. मोजून आपल्या संघात घेतले होते. हा प्रकार रबाडाच्या उज्वल कारकिर्दीला मोठा धक्का मानला जात असून, त्याच्या पुनरागमनाबाबत मोठ्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
रबाडाच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीकडे पाहिले, तर त्याने आतापर्यंत ६५ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत आणि यामध्ये त्याने ७१ बळी घेतले आहेत. १८ धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचा इकॉनॉमी रेट ८.३० असून आसपास असून, त्याचा स्ट्राइक रेट १९.६ आहे. रबाडाने टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २०२१ आणि २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये त्याने आफ्रिकेला विजय मिळवून देणाऱ्या अनेक मॅचविनिंग स्पेल्स टाकल्या. त्याची यॉर्कर आणि डेथ ओव्हर्समधील अचूकता हाच आफ्रिकेच्या यशाचा प्रमुख घटक ठरला.