🏆पणजी : मुरगाव तालुका बुद्धिबळ संघटना (एमटीसीए) यांच्या वतीने
चौथी वेंकटेश आणि सुमती शानभाग स्मृती अखिल भारतीय फिडे जलद मानांक बुद्धिबळ फिरती ट्रॉफी स्पर्धा
१७ व १८ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे.
🙏ही मानाची स्पर्धा सुखांत शानभाग यांच्या पालकांच्या सन्मानार्थ आयोजित केली जात आहे.
💰स्पर्धेसाठी एकूण रु. १,२५,०००/- च्या बक्षिसांची रक्कम ठेवण्यात आली आहे, त्यामुळे देशभरातील आघाडीचे बुद्धिबळपटू यात सहभागी होणार आहेत. 🏅यामध्ये दोन इंटरनॅशनल मास्टर्सचा (आयएम) समावेश आहे, ज्यामुळे स्पर्धेला प्रारंभीच मोठा प्रतिसाद मिळत आहे. 👑इंटरनॅशनल मास्टर अमेय अवदी याने मागील दोन वर्षे सलग या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे आणि यंदा हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहेत.
🔢या स्पर्धेस केवळ ३५० खेळाडूंनाच प्रवेश दिला जाणार असून, आतापर्यंत १०० पेक्षा जास्त नोंदी प्राप्त झाल्या आहेत. 🌟ही स्पर्धा रेटिंग नसलेल्या खेळाडूंनाही फिडे रॅपिड रेटिंग मिळवण्याची संधी देणार आहे, त्यामुळे नवख्या खेळाडूंनाही मोठ्या प्रमाणावर संधी मिळणार आहे.
📞स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी एमटीसीए सचिव मुकुंद कांबळी (९९२१८९६९४०) किंवा मुख्य आर्बिटर आयए संजय कावळेकर (९८२३२५८७११) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.