सामन्याच्या सुरुवातीला प्रियांश आर्याची फटकेबाजी : प्रभसिमरन सिंगचे नाबाद अर्धशतक
धर्मशाला : धर्मशाला येथे पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्या सामना सुरु असलेला सामना पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्याने सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला. पाकिस्ताने गुरुवारी रात्रीच्या वेळेस जम्मू शहरावर ड्रोनने हल्ला केला. त्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला. पाकिस्तानने ८ मिसाईल्स सोडून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या एस ४०० या डिफेन्स सिस्टीमने हा हल्ला परतवून लावला. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना देखील भारताने प्रत्युत्तर दिले. जम्मू, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर आयपीएलचा पंजाब विरुद्ध दिल्ली हा सामना थांबवण्यात आला.
पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रियंश आर्या आणि प्रभासिमरन सिंग यांनी जोरदार फटकेबाजी करत १२२ धावांची भागिदारी रचली. प्रियंश आर्याने ३४ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने ७० धावा केल्या. तर प्रभासिमरन सिंगने २८ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ५० धावा केल्या होत्या. १०.१ षटकामध्ये १ गडी गमावून १२२ धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रेयस अय्यरची मैदानात एंन्ट्री झाली होती. मात्र अचानक मैदानातील लाईट खराब झाल्याचे कारण देऊन सर्व खेळाडूंसह सपोर्टस्टाफला मैदानातून बाहेर केले गेले होते. त्यानंतर प्रेक्षकांनाही लवकरात लवकर स्टेडिअम खाली करायला लावले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नंतर देण्यात आली.
मुंबई विरुद्ध पंजाब सामन्याचे ठिकाण बदलले
रविवारी ११ मे ला होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याचे ठिकाणही बदलण्यात आले आहे. सुरूवातीला हा सामना मुंबईमध्ये होणार असल्याचे बोलले जात होते. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्समधील सामना गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. यासंदर्भात गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी ही माहिती दिली. मुंबई आणि पंजाबमधील सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. कारण धरमशाला आणि आसपासची विमानतळे बंद असल्यामुळ मुंबई इंडियन्सला पंजाबकडे जाता आले नाही. बुधावारी ते विमानाने जाणार होते. परंतु विमानतळ बंद असल्याने ते मुंबईमध्येच थांबल्याचे अनिल पटेल यांनी सांगितले. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण प्ले-ऑफच्या अंतिम चारमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना विजय मिळवावा लागणार आहे. पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स १२ सामन्यांत सात विजय मिळवत १४ गुणांसह हे चौथ्या तर पंजाब किंग्ज ११ सामन्यांमध्ये सात विजयांसह पंजाब किंग्ज हे तिसऱ्या स्थानावर असणार आहेत. तसं पाहायला गेलं तर मुंबईकडे आता फक्त दोन सामने बाकी आहेत आणि पंजाबकडे तीन सामने त्यामुळे आपलं प्ले-ऑफचे तिकीट फायनल करायचे असेल तर दोन्ही संघांना हा सामना महत्त्वाचा आहे.
दोन्ही संघांना गुण नाहीत
दोन्ही संघाकडे दोन-दोन सामने उरले आहेत. त्यामुळे जो सामना जिंकेल आणि ज्याचा रनरेट जास्त असेल त्याला प्लेऑफमध्ये चौथे स्थान मिळणार आहे. दरम्यान जर एखादा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघाना एक -एक गुण देण्यात येतो. मात्र हा सामना तांत्रिक कारणामुळे बंद झाल्याने दोन्ही संघाना एक एक गुण देण्यात आला नाही.
खेळाडूंसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था
पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्यानंतर सामन्यातील खेळाडू, मैदानातील कर्मचारी, समालोचक आणि अन्य संबंधित लोकांना घरी सुरक्षित पाठवण्याची जबाबदारी बीसीसीआयची होती. त्यासाठी बीसीसीआयने एक खास व्यवस्था केली. सर्व खेळाडूंना धर्मशाला येथून उना येथे नेण्यात आले आणि त्यानंतर उना या ठिकाणावरून खास ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. या ट्रेनच्या मदतीने सर्वांना सुरक्षित घरी पोहोचवण्यात आले.