पोलिसांच्या बदल्या नियमित प्रशासकीय प्रक्रियेचा भाग : पोलीस अधीक्षक
पणजी : सुमारे दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले पोलीस निरीक्षकांचे बदलीचे आदेश एकाच दिवशी जारी करण्यात आले. यामध्ये गुरुवारी एकूण ५० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. पोलीस खात्यात बराच काळ बदल्या झाल्या नव्हत्या. या बदल्या नियमित प्रशासकीय प्रक्रियेचा भाग आहेत. आता पोलीस निरीक्षकांची संख्या वाढल्यामुळे एकूण ५० पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करावे लागले, अशी माहिती पोलीस अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी दिली.
पोलीस अधीक्षक अल्बुकर्क यांच्या मते, यापूर्वी ८ ते १० पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले जात होते. दरम्यान, सध्या पर्यटन हंगाम सुरू असल्यामुळे राज्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. काही दिवसांपूर्वी पर्यटकांकडून तसेच शॅक कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांवर हल्ला झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यानुसार कळंगुट, मांद्रे, बेतुल किनारी सुरक्षा आणि तळपण किनारी पोलीस शाखांच्या निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे.
या आदेशाप्रमाणे, निरीक्षक संजीत कांदोळकर यांची पर्वरी वाहतूक शाखेतून कोलवाळ पोलीस ठाण्यात तर मंगेश वळवईकर यांची एसीबी दक्षता विभागातून रायबंदर गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.
इतर पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पुढीलप्रमाणे
गिरेंद्र नायक (पणजी सुरक्षा शाखेकडून मांद्रे पोलीस ठाणे), निनाद देऊलकार (रायबंदर गुन्हा शाखेतून मोपा विमानतळ वाहतूक शाखा), शेरीफ जॅकीस (मांद्रेतून मुरगाव), सूरज सामंत (जीआरपीतून मडगाव शहर), मिलिंद भूइंबर (वेल्फेर सोसायटी आल्तिनोतून साळगाव), सोमनाथ महाजीक (साळगाव येथून तेरेखोल किनारी सुरक्षा), विक्रम नायक (तेरेखोल किनारी सुरक्षातून पणजी सुरक्षा शाखा), चंद्रकांत गावस (पणजी सुरक्षातून डिचोली वाहतूक शाखा), गौरेश परब (डिचोलीतून पणजी मुख्यालय), महेश वेळीप (पणजी मुख्यालयातून कुडचडे वाहतूक शाखा), धीरज देविदास (मुरगावतून पर्वरी वाहतूक शाखा), सचिन नार्वेकर (कळंगुट वाहतूक शाखेतून एसपीसीआर पणजी), ब्रेंडन डिसोझा (एसपीसीआर पणजीतू कळंगुट वाहतूक शाखा), जितेंद्र नायक (डीजीपी कार्यालयातू सांगे), मेल्सन कुलासो (वेर्णातून जीआरपी), आनंद शिरोडकार (एफआरआरओ पणजीतून वेर्णा), महेश केरकर (मोपा विमानतळ वाहतूक शाखेतून वेल्फेर सोसायटी, आल्तिनो), टेरेंस वाझ (एससीआरबी पणजीतून जीआरपी), संध्या गुप्ता (पुलीस मुख्यालयातून रायबंदर गुन्हा शाखा), विनायक पाटील (जीआरपीतून मडगाव एसबी शाखा), हिरू कवळेकर (मडगाव एसबी केंद्रातून रायबंदर गुन्हे शाखा), मिरा डिसिल्वा (एसपीसीआर पणजीतून एएनसी), प्रवीण गावस (सांगेतून टीईसी पणजी), नवलेश देसाई (तळपण किनारी सुरक्षेतून बेतुल किनारी सुरक्षा), थेरोन डिकोस्ता (बेतूल किनारी सुरक्षेतून तळपण किनारी सुरक्षा), दत्ताराम राऊत (रायबंदर गुन्हे शाखेतून जीआरपी), तुळशीदास नायक (मडगावतून जीआरपी), सगुण सावंत (डीजीपी रीडरमधून एसबी पणजी), विजय राणे सरदेसाई (कोलवाळतून रायबंदर गुन्हे शाखा), वैभव नाईक (कुडचडेतून वास्को), तुकाराम चव्हाण (पोलीस मुख्यालयातून वास्को वाहतूक शाखा), अल्वितो रॉड्रिग्ज (कोलवा वाहतूक शाखेतून वास्को वाहतूक शाखा), दत्तगुरू सावंत (पणजी सुरक्षेतून डीजीपी रीडर), शैलेश नार्वेकर (वास्को वाहतूक शाखातून एसीबी दक्षता), अजित उमर्ये (पणजी किनारी सुरक्षेतून डीजीपी रीडर), रादेश रामनाथकर (पणजी एसबी केंद्रातून हार्बर किनारी सुरक्षा), प्रदीप वेळीप (हार्बर किनारी सुरक्षेतून पणजी एसबी केंद्र), कपिल नायक (वास्कोतून एसीबी), चेतन सौलेकर (पणजी वाहतूक शाखेतून हणजूण वाहतूक शाखा), शिताकांत नायक (हणजूण वाहतूक शाखेतून पणजी वाहतूक शाखा), परेश नावेलकर (पणजी सुरक्षातून पीटीएस वाळपई), उदय गावडे (एसबी पणजीतून एटीएस), ब्रुटानो पॅक्सीटो (एटीएसमधून दक्षता शाखा पणजी), रामकृष्ण मंगेशकर (दक्षता शाखेतून सुरक्षा/बीडीडीएस पणजी), राजेश जॉब (पीटीएस वाळपईतून एससीआरबी पणजी), अनुश्का पै बीर (पणजी पीटीशन शाखेतून सायबर गुन्हे), लोवेलीन डायस (पणजी पीटीशन शाखेतून एएचटीयू पणजी), विलेश दुर्भाटकर (एटीएसमधून जीआरपी).
सुनिसा सावंत एएनसीच्या अधीक्षक
कार्मिक खात्याने जारी केलेल्या दोन वेगवेगळ्या आदेशांत आयपीएस अधिकारी टिकम सिंग वर्मा यांची दक्षिण गोवा अधीक्षकपदी, तर सुनीता सावंत यांची एएनसीच्या अधीक्षकपदी बदली केली आहे.