राज्य ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेचा यशस्वी समारोप

गोवा ज्युडो असोसिएशनतर्फे आयोजन : स्पर्धेत राज्यभरातील ज्युडोकांच्या प्रतिभेचे प्रदर्शन

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st April, 11:09 pm
राज्य ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेचा यशस्वी समारोप

पणजी : गोवा ज्युडो असोसिएशनतर्फे आयोजित राज्य ज्युडो अजिंक्यपद स्पर्धा २०२४-२५, म्हापसा येथील पेडे क्रीडा संकुलात उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातील ज्युडोकांनी प्रतिभा, मेहनत आणि खिलाडूवृत्तीचे प्रभावी प्रदर्शन केले.

स्पर्धेत सब-ज्युनियर (१० व १२ वर्षांखालील), ज्युनियर (१५ वर्षांखालील) तसेच वरिष्ठ पुरुष आणि महिला गटांमध्ये विविध स्पर्धा पार पडल्या.

गोवा ज्युडो असोसिएशनचे सचिव कृपेश वेंगुर्लेकर यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी खेळाडू, प्रशिक्षक आणि आयोजकांचे आभार मानले. या स्पर्धेद्वारे गोवा ज्युडो असोसिएशनने राज्यातील तरुण प्रतिभेला चालना देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला बळ दिले आहे.

चॅम्पियनशिप विजेते

सब ज्युनियर मुले विजेते - जया आरसीसी, उपविजेते : बांदोडा आरसीसी. सब ज्युनियर मुली - विजेते : जया दोजो, उपविजेते : जनता हायस्कूल, कॅडेट मुले - विजेते : फोंडा आरसीसी, उपविजेते : पणजी आरसीसी. कॅडेट मुली - विजेते : पणजी आरसीसी, उपविजेते : म्हापसा आरसीसी, ज्येष्ठ पुरुष - विजेते : म्हापसा आरसीसी, उपविजेते : पणजी आरसीसी. ज्येष्ठ महिला

विजेते - म्हापसा आरसीसी, उपविजेते : पणजी आरसीसी.

चॅम्पियनशिपमधील सर्वोत्तम स्पर्धक

सब-ज्युनियर मुले : अभिषेक गौतम (जनता हायस्कूल)

सब-ज्युनियर मुली : दीर्घा शेख (पणजी आरसीसी)

कॅडेट मुले : पवन पटेल (फोंडा आरसीसी)

कॅडेट मुली : अफशा शेख (पणजी आरसीसी)

ज्येष्ठ पुरुष : उमेश कांबळे (बांदोडा ज्युडो क्लब)

ज्येष्ठ महिला : तनिष्का शिवोलकर (म्हापसा आरसीसी)