शिक्षण : यंदाही महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनच...

११ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत स्वीकारणार अर्ज

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th March, 04:04 pm
शिक्षण : यंदाही महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनच...

पणजी : कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील व इतर पदवी अभ्यासक्रमासाठीची महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रीया यंदाही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ११ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत ऑनलाईन स्वरूपात अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर यांनी दिली. बारावीचा निकाल यंदा लवकर झाल्याने महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे.

अर्ज स्वीकारल्यानंतर पात्रता यादी व गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानुसार प्रवेश दिला जाईल. यंदा बारावीचा निकाल २७ एप्रिल रोजी म्हणजे जवळ जवळ २२ दिवस अगोदर झाला. दरवर्षी तो २० मे नंतर व्हायचा. निकाल जाहीर झाला असला तरी गुणपत्रिका मिळण्याबरोबर इतर प्रमाणपत्रे घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळायला हवा. यासाठी ११ एप्रिलपासून अर्ज स्वीकारण्याची तारीख निश्चित केली आहे.

तसेच फेरतपासणी, फेरमोजणीची प्रक्रीयाही अद्याप होणे बाकी आहे. यामुळे निकालानंतरही काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल होणे शक्य आहे. प्रवेशासाठी www.dhe.goa.gov.in. या पोर्टलव्दारे अर्ज सादर करणे गरजेचे आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी या व्यावसायिक महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रीया तांत्रिक शिक्षण संचालनालयातर्फे होणार आहे.


हेही वाचा