काणकोण : अन्नपाण्याच्या शोधात निघालेली दोन जंगली मांजरं अडकली सरकारी शाळेच्या छतावर

वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लावलेल्या पिंजऱ्यात एक मांजर अडकले दुसऱ्याने जंगलात काढला पळ

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th March, 02:21 pm
काणकोण : अन्नपाण्याच्या शोधात निघालेली दोन जंगली मांजरं अडकली सरकारी शाळेच्या छतावर

पणजी : काणकोण तालुक्यातील आगोंद हा निसर्गसंपन्न गाव. येथे दृष्टीस पडणारी हिरवळ पाहून जीव सुखावतो. पण येथे असलेल्या रानावनात जंगली जनावरांचा सुळसुळाट आहे. काल येथील सरकारी माध्यमिक शाळेच्या छतावर अन्न आणि पाण्याच्या शोधात निघालेल्या दोन रान मांजरी पोहोचल्या. त्यांनी रात्रभर येथे मुक्काम केला. त्यांना तेथून निघता आले नाही व त्यांनी आवाज केला. 

दरम्यान हा आवाज ऐकून येथील शिक्षकांत भीती निर्माण झाली. त्यांनी तत्काळ वन खात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. अधिकाऱ्यांनी दाखल होत पाहणी केली. येथे त्यांना वन्य प्राण्यांची विष्ठा आढळली. शाळेच्या आवारात अधिक तपासणी केल्यावर त्यांना दोन सिव्हेट मांजरी आढळल्या. वन विभागाने त्यांना पकडण्यासाठी तात्काळ सापळा रचला. सापळा लावल्यानंतर एक मांजर पिंजऱ्यात अडकले, तर दुसरेमांजर जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले .

शाळेभोवती मोठी झाडे असल्याने, प्राणी फांद्यांमधून छतावर पोहोचू शकतात. त्यामुळे, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काही झाडे तोडण्याचा विचार करण्याची विनंती शिक्षकांनी वन विभागाला केली आहे. पकडलेल्या सिव्हेट मांजरीला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. या मांजराला शाळेपासून दूर सुरक्षित अंतरावर नेत सोडले जाईल. 


हेही वाचा