आजरा : अक्कलकोटला देवदर्शन करून गोव्यात येताना झाला वाहनाचा स्वयंअपघात; महिला ठार

कुटुंबातील तिघा जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28th March, 11:44 am
आजरा : अक्कलकोटला देवदर्शन करून गोव्यात येताना झाला वाहनाचा स्वयंअपघात; महिला ठार

म्हापसा : शिर्डी – अक्कलकोट देवदर्शन करून गोव्यात परत येत असताना आजरा-आंबोली मार्गावरील सुळेरान येथे एका कारचा स्वयंअपघात होऊन ती पलटी झाली. यात कामुर्ली-बार्देश येथील मासेविक्रेती अंकिता अजित भोसले (५०) या मृत पावल्या. तर अजित हरिश्चंद्र भोसले (वय ५६ वर्षे) आशिष अजित भोसले (२९) व अंकेश अजित भोसले ( ३१ ) हे तिघेजण जखमी झाले आहेत.



हाती आलेल्या माहितीनुसार, भोसले कुटुंबीय बुधवारी दुपारी कामुर्ली येथील आपल्या निवासस्थानाहून शिर्डी-अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघाले. गुरुवारी देवदर्शन घेऊन सायंकाळी सहा वाजता ते परतीच्या प्रवासाला निघाले. गोव्याच्या दिशेने येत असताना आज शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास सुळेरान येथील वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याशेजारी असलेल्या जाहिरात फलकाला धडकली आणि पलटी झाली.



अपघातात अंकिता भोसले यांचा मृत्यू झाला. तर अजित हरिश्चंद्र भोसले (वय ५६ वर्षे) आशिष अजित भोसले (२९) व अंकेश अजित भोसले ( ३१ ) हे तिघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. आजरा पोलीस पुढील तपास करत आहेत.


हेही वाचा