सोशल :..त्याने जवळच्या गटारातून घाण पाणी काढले आणि विक्रीसाठी आणलेल्या मासळीवर ओतले

मासळी विक्रेत्याचे किळसवाणे कृत्य कॅमेऱ्यात कैद ! झाले क्षणात व्हायरल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th March, 03:10 pm
सोशल :..त्याने जवळच्या गटारातून घाण पाणी काढले आणि विक्रीसाठी आणलेल्या मासळीवर ओतले

पणजी : ताजे फडफडीत मासे हा गोवेकरांचा जिव्हाळ्याचा विषय. तीनचार दिवस जेवणात शितकडी किंवा तळलेले मासे न दिसल्यास गोवेकर स्वतः माशासारखा फडफडतो. दरम्यान सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमुळे मच्छीप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. एका मासळी विक्रेत्याने आपला स्टॉल लावला आहे. समोरील कंटेनर्समध्ये मासे आहेत. हा विक्रेता आपल्या स्टॉलच्या बाजूलाच असलेल्या गटारातून बादल्या भरून अनेक वेळा मासळी असलेल्या कंटेनर्समध्ये टाकत आहे. दरम्यान सदर व्हिडिओ हा पॉवर हाऊस, आके-मडगाव येथील असून व्हिडिओचे चित्रीकरण करणाऱ्याने तसे त्यात म्हटले आहे. 

पहा हा व्हिडिओ 


दरम्यान हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबत संभ्रम आहे. पण सामान्य जनतेच्या जीवाशी दिवसाढवळ्या सुरू असलेला हा खेळ पाहून कुणाचेही डोके फिरेल. विविध सोशल मीडिया हँडल्सवर हा बराच व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

सामान्य जनतेच्या जीवाशी हा अशा प्रकारे खेळ काही नवीन नाहीच. अनेकजण अशी कृत्ये करतात. पण सापडला तरच तो चोर या उक्तीच्या हिशेबाने सगळेच काही आलबेल आहे असेच म्हणावे लागेल. याआधी मडगावातच फोर्मेलीनचा मुद्दा गाजला होता. त्यात आता या मासळी विक्रेत्याची अशी थेरं समोर आल्यानंतर तर लोकांत धास्तीच पसरली आहे. संबंधित यंत्रणेने अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जनमानसातून सध्या व्यक्त केली जात आहे.   


हेही वाचा