शाहजहानपुरमधून समोर आलेल्या या घटनेमुळे खळबळ
शाहजहानपुर : उत्तर प्रदेशातील शाहजहानपु मध्ये एक खळबळजनक घटना घडली. पती-पत्नीमध्ये भांडण झाले. वादानंतर पत्नी तिच्या माहेरी गेली. संतप्त पतीने नंतर धक्कादायक पाऊल उचलले. त्याने आपल्या ४ मुलांचे गळे क्रूरपणे चिरले. मुलांच्या हत्येनंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर पोलीस तिथे पोहोचले. रक्ताने माखलेले मृतदेह पाहून पोलीसही थक्क झाले. रोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानपूर चक्री गोटिया गावात ही घटना घडली. पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मानपूर चक्री गोटिया गावातील रहिवासी राजीव यांचे त्यांच्या पत्नीशी वाद झाले होते. भांडणानंतर पत्नी तिच्या पालकांच्या घरी गेली. राजीवचे वडील पृथ्वीराज शेतात होते. गुरुवारी सकाळी ६ वाजता ते शेतातून घरी पोहोचले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी हाक मारली, पण गेट कुणी उघडला नाही. ते भिंतीवरून उडी मारून आत गेले तेव् त्यांनाहा खोलीभर रक्त पसरले असल्याचे दिसून आले. चारही मुलांचे रक्ताने माखलेले मृतदेह खाटेवर पडले होते, तर राजीव फासावर लटकत होता.
मुलांचे मृतदेह पाहून पोलिसांनाही बसला धक्का
माहिती मिळताच पोलिस पोहोचले. मुलांचे मृतदेह पाहून पोलीसही घाबरले. पोलिसांनी हत्येत वापरलेले शस्त्र जप्त केले आहे. सुरुवातीच्या तपासात हत्येनंतर राजीवने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. राजीवची मानसिक स्थिती चांगली नव्हती. पोलिसांनी मुलांच्या आईला माहिती दिली आहे. चौकशीनंतर चित्र स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडील राजीव कुमार यांनी त्यांच्या मुली स्मृती (१२), कीर्ती (९) आणि प्रगती (७) आणि मुलगा ऋषभ (११) यांची झोपेत असताना हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक टीमने खोलीची तपासणी केली आहे. तसेच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.