सोशल : 'रिक्शावाला' वादानंतर कॉमेडियन कामराचे अजून एक विडंबन गीत रिलीज

आता 'हम होंगे गरीब, देश का सत्यानाश' म्हणतोय कामरा ! पहा व्हिडिओ

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26th March, 10:19 am
सोशल : 'रिक्शावाला' वादानंतर कॉमेडियन कामराचे अजून एक विडंबन गीत रिलीज

मुंबई : स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरील 'पॅरोडी सॉन्ग'वरून वाद वाढत आहे. मुंबई पोलीस कुणालभोवतीचा फास आवळत आहेत. आता कामराला धमक्याही येऊ लागल्या आहेत. कामरा यांना ५०० धमकीचे फोन आले आहेत. फोन करणाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या संपूर्ण वादात, कुणाल कामराने काल २५ मार्च रोजी सोशल मीडियावर आणखी एक नवीन पॅरोडी गाणे पोस्ट केले.

हम होंगे कंगाल एक दिन 

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वाद आणि गोंधळादरम्यान, कुणाल कामराने सोशल मीडियावर आणखी एक नवीन पॅरोडी गाणे पोस्ट केले. २५ मार्च रोजी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कुणाल गाणे गात आहे 

असे आहेत गाण्याचे बोल 

'हम होंगे कंगाल एक दिन,

 मन में अंधविश्वास देश का सत्यानाश, 

 हम होंगे कंगाल एक दिन।

 होगा गाय का प्रचार, लेके हाथों में हथियार। 

 होगा संघ का शिष्टाचार, एक दिन... जनता बेरोजगार,

 गरीबी की कगार हम होंगे कंगाल एक दिन।


पहा व्हिडिओ 



कुणालने स्वतः व्हिडिओ शेअर केला आहे. 

कुणाल कामराने रविवारी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर गाण्याचा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओ समोर आल्यानंतर रविवारी रात्री (२३ मार्च) गोंधळ उडाला. शिवसैनिकांनी मुंबईतील युनिकॉन्टिनेंटलच्या कार्यालयाची तोडफोड केली. सोमवारी तोडफोडीच्या आरोपाखाली शिवसेना नेते राहुल कनाल यांच्यासह ११ शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी ४० शिवसैनिकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. 



सोमवारी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराविरुद्ध अशांतता भडकवणे आणि बदनामी करण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील खार पोलीस ठाण्यात कामराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी मुंबईतील हॅबिटॅट स्टुडिओचा एक भाग पाडला. आता पोलिसांनी कामरा यांना हजर राहण्याचे आदेश देऊन नोटीस पाठवली आहे. काल चौकशीसाठी सकाळी ११ वाजता खार पोलीस ठाण्यात बोलावले होते. कामरा पोलीस स्टेशनला पोहोचला नाही. कामराच्या वकिलाने पोलिसांकडून ७ दिवसांचा वेळ मागितला आहे. कामरा सध्या मुंबईबाहेर आहे.


हेही वाचा