जीपीएससी - विशेष अभ्यास

जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होते तेव्हा जीपीएससीच्या संकेतस्थळावर संपूर्ण डिटेल अभ्यासक्रम उपलब्ध केला जातो. तेव्हा नेमका काय व कसा अभ्यास करू ही चिंता करू नये.

Story: यशस्वी भव: |
12 hours ago
जीपीएससी -  विशेष अभ्यास

जीपीएससी अंतर्गत मुख्यत्वे दोन विषयांवर परीक्षा घेतली जाते. एक अशी पोस्ट असते की ज्याचा अभ्यास सर्वांना समसमान असतो. उदाहरणार्थ, जेएसओ अर्थात ज्युनिअर स्केल ऑफिसर हा सनदी अधिकारी स्वरूपाचा असतो आणि याला यूपीएससीच्या अभ्यासक्रमाला समकक्ष अभ्यास करावा लागतो. खूपसे याचे विषय हे यूपीएससीचेच असतात. 

दुसरा विषय असा आहे की डिपार्टमेंट वाईस अथवा संघटित खाते विषयक विषयावर परीक्षा घेऊन पोस्ट भरल्या जातात. उदाहरणार्थ गोवा शिक्षण खात्या अंतर्गत शिक्षण पदासाठी जर पोस्टस भरायच्या असतील तर त्या परीक्षेतील अभ्यासक्रम ‘शिक्षण व शिकवणे’ या विषयावर ६०% प्रश्न असतात. म्हणजे ज्याला ‘कोअर सब्जेक्ट’ असे म्हणतात. शिक्षण खात्याअंतर्गत ‘शिक्षक’ भरतीसाठी  

१) शैक्षणिक धोरणे
२) राईट टू एज्युकेशन
३) शिक्षण आणि कॉम्प्युटर व तंत्रज्ञान
४) विद्यार्थ्यांचे ‘इव्हॅल्युएशन’ असे करतात.
५) विद्याचरण नीट होतंय की नाही याचे ‘अॅसेसमेंट’ अर्थात पृथककरण असे करतात.
६) शिक्षकाची मानसिकता
७) विद्यार्थींची मानसिकता
८) आधुनिक समाजात शिक्षकाचे स्थान
९) टेक्नोलॉजी व शिक्षण 

इत्यादी विषयावर प्रश्न असतात. थोडक्यात काय, तर फिशरिज डिपार्टमेंट पोस्टसाठी फिशरिज अर्थात मासे, समुद्र माशांचे प्रकार, बंदरे इत्यादी विषयावर प्रश्न विचारतात. 

विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसताना, फॉर्म भरताना या विषयांवरील पुस्तके जरूर आणावीत व त्यांच्या अभ्यासाचे नीट नियोजन करावे. मग सिरीयसली परीक्षा द्यावी. अगदी प्राण पणाला लावून अभ्यास करावा. एकदा करून तर बघा नक्कीच पास व्हाल. अनेक सरकारी अधिकारी नक्कीच बना. मनाने एकदा पक्के केले तर सर्व काही साध्य होते.

जीपीएससी - टिचर ग्रेड पोस्ट 

जीपीएससीला राज्य शिक्षण खाते त्या खात्या अंतर्गत किती पोस्टस शिक्षकांच्या रिक्त आहेत व भरणे आवश्यक आहे असे वारंवार कळवत असते. दरवर्षी काही शिक्षक निवृत्त होत असतात. त्यामुळे रिक्त पदे पुढे नव्याने तयार होत जातात. त्यामुळे या रिक्त पदांसाठी जीपीएससी टिचर ग्रेट-I ही परीक्षा राबवत असते. कम्प्युटर बेस्ट रिक्रुटमेंट टेस्ट (CBRT) अशी परीक्षा संगणकावर घेतली जाते. 

एकूण ५० मिनिटे म्हणजे दीड तास ही परीक्षा चालते. या परीक्षेमध्ये दोन भाग असतात. दोन्ही भागांना मिळून एकत्रित ७५ प्रश्न विचारले जातात. प्रत्येकी एक मार्क दिला जातो. याला निगेटिव्ह मार्किंग असते. पहिल्या परीक्षा भागात एकूण २५ प्रश्न असतात. यात ५ मार्कासाठी इंग्रजी आणि त्याचे व्याकरण यातील प्रश्न असतात. जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, इव्हॅट्स ऑफ नॅशनल अन् इंटरनॅशनल इपोर्टन्स या सर्व विषयाचे १० प्रश्न विचारले जातात. तर लॉजिकल रिझनिंग व अॅनालॅटिकल अॅबिलीटीस् या विषयाचे १० प्रश्न असतात. 

जनरल नॉलेज म्हणजे एकूणच कोणत्याही विषयावरील सामान्य ज्ञान, तर करंट अफेअर्स म्हणजे मानसिक १ वर्षात घडलेल्या घडामोडी. खूपदा विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज व करंट अफेअर्स या दोन विषयात गफलत होते. दुसऱ्या भागात एकूण ५० प्रश्न विचारले जातात. यामध्ये एज्युकेशन टेक्नोलॉजी, इव्ह्युएशन अँड अॅसेटमेंट सायकोलॉजी ऑफ लर्नर अँड लर्निग, द टिचर इन अॅमरजिंग इंडियन सोसायटी या विषयावर प्रश्न असतात. 

जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होते तेव्हा जीपीएससीच्या संकेतस्थळावर संपूर्ण डिटेल अभ्यासक्रम उपलब्ध केला जातो. तेव्हा नेमका काय व कसा अभ्यास करू ही चिंता करू नये. जनरल कॅटेगरीला ४५ गुण, ओबीसींना ४२ गुण व एससी/एसटी गुण हा ‘कट ऑफ’ असतो. जर दोन उमेदवारांचा मार्गाचा ‘टाय’ झाला, तर त्याचे अॅकेडेमिक गुण आणि त्याचे वय हे विचारात घेऊन क्रमवारी लावले जाते. परीक्षा ‘कट ऑफ’ च्या वर उत्तीर्ण झाल्यास या उमेदवाराचा इंटरव्हयू घेऊन त्यानुसार निवड केली जाते.


अॅड. शैलेश कुलकर्णी
(लेखक नामांकित वकील आणि
करिअर समुपदेशक आहेत.)