ड्रॅगन चिकन

Story: चमचमीत रविवार |
28th February, 11:31 pm
ड्रॅगन चिकन

साहित्य:

​चिकन मॅरीनेशनसाठी:

​३०० ग्रॅम बोनलेस चिकन (तुकडे किंवा पट्ट्यांमध्ये कापलेले)

​१/२ चमचा मीठ

​ताजी कुटलेली काळी मिरी

​२ चमचे सोया सॉस

​१ अंडे

​२-३ चमचे कॉर्न फ्लोअर

​सॉस आणि फोडणीसाठी:

​तळण्यासाठी तेल

​२ मोठे चमचे तेल (सॉससाठी)

​१/४ कप काजूचे तुकडे

​१ चमचा बारीक चिरलेलं आलं

​१ चमचा बारीक चिरलेला लसूण

​२ चमचे चिली फ्लेक्स

​१/२ कप कांद्याची पात (पांढरा भाग, चिरलेला)

​१/२ कप सिमला मिरची (लांब कापलेली)

​२ चमचे सोया सॉस

​४ चमचे चिली सॉस

​३ मोठे चमचे टोमॅटो केचप

​१ चमचा साखर

​चवीनुसार मीठ

​२ चमचे कॉर्न फ्लोअर (थोड्या पाण्यात विरघळलेले)

​१ कप पाणी

​बारीक चिरलेली हिरवी कांद्याची पात (सजावटीसाठी)

​कृती:

​एका बाऊलमध्ये चिकनचे तुकडे घेऊन त्यात मीठ, काळी मिरी, सोया सॉस, अंडे आणि कॉर्न फ्लोअर घालून व्यवस्थित एकत्र करा. हे मिश्रण किमान ३० मिनिटे बाजूला ठेवा. कढईत तेल गरम करून मॅरीनेट केलेले चिकनचे तुकडे मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

 एका दुसऱ्या कढईत २ चमचे तेल गरम करा. त्यात काजूचे तुकडे घालून सोनेरी रंग येईपर्यंत परता. आता त्यात चिरलेले आलं, लसूण आणि चिली फ्लेक्स घालून थोडे परता. त्यानंतर कांद्याच्या पातीचा पांढरा भाग आणि सिमला मिरची घालून काही सेकंद परतून घ्या. कढईत सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो केचप, साखर आणि थोडे मीठ घालून नीट मिक्स करा. अर्धा कप पाणी घाला आणि सॉसला उकळी येऊ द्या. आता कॉर्न फ्लोअरचे मिश्रण (पाण्यात विरघळलेले) घालून सॉस घट्ट होईपर्यंत शिजवा. गरज वाटल्यास अजून थोडे पाणी घालून कन्सिस्टन्सी नीट करून घ्या. तयार सॉसमध्ये तळलेले चिकनचे तुकडे घाला आणि ५ मिनिटे कमी आचेवर शिजवा, जेणेकरून सॉस चिकनला पूर्णपणे कोट होईल.

शेवटी हिरव्या कांद्याची पात वरून पसरवून सर्व्ह करा.

    

- शिल्पा रामचंद्र, मांद्रे