वडिल - मुलीची हृदयस्पर्शी कथा ‘बी हॅपी’
आज अनेक चित्रपट, मालिका ओटीटी आणि चित्रपटगृहात दाखल होत आहेत. यामध्ये अभिषेक बच्चन अभिनीत वडील-मुलीच्या जोडीची हृदयस्पर्शी कथा असलेला ‘बी हॅपी’ रुसो ब्रदर्सचा ‘द इलेक्ट्रिक स्टेट’ हा साय-फाय चित्रपट, अखिल अक्किनेनी आणि मामूटीचा स्पाय थ्रिलर 'एजंट', यासह जॉन अब्राहमचा ‘डिप्लोमॅट’ हे चित्रपट झळकणार आहेत.
बी हॅपी । अमेझॉन प्राइम व्हिडिओ
‘बी हॅपी’ ही वडिल आणि मुलीची हृदयस्पर्शी कथा आहे. मुलीला एका मोठ्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्याची इच्छा असते, मात्र त्यांच्यासमोर काही संकटे उभी राहतात. ते या संकटांवर मात करू शकतील का, हे चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल. रेमो डिसूझा दिग्दर्शित या चित्रपटात अभिषेक बच्चन, नोरा फतेह, इनायत वर्मा, नासार, जॉनी लिव्हर मुख्य भूमिकेत आहेत.
द डिप्लोमॅट । थिएटर्स
हा थ्रिलर चित्रपट जेपी सिंग (जॉन अब्राहम) नावाच्या एका भारतीय राजदूताची कथा आहे, एक भारतीय नागरिक असल्याचा दावा करणारी महिला दूतावासात आश्रय घेण्यासाठी येते आणि जेपी सिंगसाठी संकटे निर्माण करते. हा चित्रपट राजदूतत्व, आंतरराष्ट्रीय संबंध आणि जगभरातील राजदूतांना भेडसावणाऱ्या वैयक्तिक संघर्षांवर प्रकाश टाकतो.
द इलेक्ट्रिक स्टेट । नेटफ्लिक्स
सायमन स्टॅलेनहॅग यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित, ‘द इलेक्ट्रिक स्टेट’ हा एक रोमांचक साय-फाय साहसी चित्रपट आहे, जो एका अनाथ किशोरवयीन मुलाच्या जीवनावर आधारीत आहे. त्याला आपल्या धाकट्या भावाचा शोध घेण्यासाठी एका रहस्यमय रोबोट आणि तस्करांची मदत घ्यावी लागते. या चित्रपटात मिली बॉबी ब्राउन, क्रिस प्रॅट, के हुई क्वान, अँथनी मॅकी आणि वुडी हॅरेलसन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
इन द लॉस्ट लँड्स । थिएटर्स
जॉर्ज आरआर मार्टिन यांच्या याच नावाच्या लघुकथेचे रूपांतर असलेला इन द लॉस्ट लँड्स हा एक रोमांचक काल्पनिक थरारक चित्रपट आहे. जो एक जादूगार (मिला जोवोविच) भोवती केंद्रित आहे. जी एक कुशल शिकारी (डेव्ह बॉटिस्टा) सोबत मिळून एका धोकादायक मोहिमेवर निघते आणि हरवलेल्या भूमीचा शोध घेते.
एजंट । सोनी लिव्ह
हा अॅक्शन, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेला तेलुगु स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. जो तुम्हाला शेवटपर्यंत तुमच्या सीटवर बांधून ठेवतो. कथानक रिकी (अखिल अक्किनेनी) भोवती फिरते, जो एक धाडसी ऑपरेटिव्ह आहे. ज्याला दहशतवादी संघटनेत घुसखोरी करण्याचे काम सोपवण्यात येते. जेव्हा रिकीसोबत कर्नल महादेव (ममुटी) त्याच्या मोहिमेशी जुळतो तेव्हा गोष्टी गुंतागुंतीच्या बनतात.
नोवोकेन । थिएटर्स
नोवोकेन हा एक अॅक्शन-पॅक कॉमेडी चित्रपट आहे, जो नॅथन केन (जॅक क्वाएड) च्या अवती भवती फिरतो. ज्याला दुर्मिळ आजार आहे. जो त्याच्या स्वप्नातील मुलीला (अंबर मिडथंडर) अपहरण करणाऱ्या गुंडांपासून वाचवण्याच्या मोहिमेवर निघतो.
वनवास । झी ५
नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर अभिनीत हा कौटुंबिक चित्रपट एका वृद्ध व्यक्तीभोवती फिरतो. ज्याची स्मृति हळूहळू नष्ट होत चालली आहे आणि त्याची मुले त्याचा सांभाळ करू इच्छित नाहीत.
मोआना २ । जिओ हॉटस्टार
मोआना (२०१६) च्या यशानंतर, निर्माते त्याच्या सिक्वेलसह परतले आहेत, जे नायिका मोआनाची कहाणी पुढे नेतात. जी तिच्या पूर्वजांकडून आलेल्या संदेशानंतर एका साहसी मोहिमेवर निघते.