चित्रपटगृह, ओटीटीवर चित्रपट, मालिकांची मेजवानी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
02nd May, 12:48 am
चित्रपटगृह, ओटीटीवर चित्रपट, मालिकांची मेजवानी

आज विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर काही बहुप्रतीक्षित नवीन वेब सिरीज, चित्रपट आणि डॉक्युमेंटरी प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये थरारक गुन्हेगारी कथा, कौटुंबिक संघर्ष, खऱ्या घटनांवर आधारित मालिकांपासून अ‍ॅक्शन आणि साहसाने भरलेल्या डॉक्युमेंटरी, यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे.


रेड २ । थिएटर

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ने बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटात अजय देवगणने अमय पटनायकची भूमिका साकारली होती. तर आता त्याचा सिक्वेल चित्रपटगृहात दाखल झाला आहे. ज्यामध्ये अजय देवगण अमय पटनायकच्या भूमिकेत परत आला आहे. तर यावेळी, अमय पटनायक रितेश देशमुख म्हणजेच एका राजकारण्याविरुद्ध लढताना दिसणार आहे.


ब्लॅक, व्हाईट अँड ग्रे : लव्ह किल्स । सोनी लिव्ह
ही सहा भागांची थ्रिलर मालिका आहे, जिच्यात डॅनियल गॅरी या पत्रकाराची कथा आहे. तो रहस्यमय खूनांच्या मालिकेची चौकशी करत असतो. तपास जसजसा पुढे जातो, तसतशी गुंतागुंत अधिक वाढत जाते. या मालिकेत मयूर मोरे, पलक जायसवाल, देवेन भोजानी, तिग्मांशू धूलिया आदी कलाकार आहेत.


अनसीन सीझन २ । नेटफ्लिक्स
दक्षिण आफ्रिकन थ्रिलर मालिका अनसीन आपल्या दुसऱ्या सत्रासह परत आली आहे. झेनझी म्वेले या गृहस्वच्छता करणाऱ्या महिलेची कथा पुढे सुरू राहणार आहे, जी आपल्या बेपत्ता पतीच्या शोधात गुन्हेगारी टोळीशी झुंज देते. या मालिकेत गेल माबालाने, वाल्डेमार शुल्ट्ज, डिनिओ लांगा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


कूल : द लेगसी ऑफ द रायसिंग्स । जीओ हॉटस्टार
एक राजघराण्याचा अत्याचारी राजा मृत्युमुखी पडल्यावर, त्यांच्या कुटुंबातील सदस्य एका सत्तासंघर्षात गुरफटतात. त्यातून घरातील जुन्या रहस्यांचा उलगडा होतो.
या मालिकेत निमरत कौर, ऋद्धी डोगरा, अमोल पराशर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


बॅड बॉयज् । नेटफ्लिक्स
ही इस्रायली मालिका डीन नावाच्या एका मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे. तो एका कठोर बालसुधारगृहातून सुटल्यावर लोकप्रिय विनोदी कलाकार बनतो. ही कथा समाजाच्या अंधाऱ्या बाजूंना उघड करते.


१०० फिट वेव्ह : सीझन ३ । जीओ हॉटस्टार
ही डॉक्युमेंटरी मालिका प्रसिद्ध सर्फर गॅरेट मॅकनॅमारा आणि त्याची पत्नी निकोल यांच्या सर्फिंग मोहिमेभोवती फिरते. ते पोर्तुगालमधील नाझारे या ठिकाणी १०० फूट लाटांवर सर्फिंग करण्याचा प्रयत्न करतात. या मालिकेची निर्माती ख्रिस स्मिथ यांनी केली आहे.


रेट्रो । थिएटर्स
साऊथ सुपरस्टार सूर्याचा 'रेट्रो' हा चित्रपट अ‍ॅक्शनने भरलेला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत होते. हा चित्रपट १ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.


हिट ३ । थिएटर्स
नानी अभिनीत चित्रपट ‘हिट ३’ हा एक क्राइम-थ्रिलर चित्रपट आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेले ‘हिट’ चित्रपटाचे दोन्ही भाग सुपरहिट झाले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटापासूनही खूप अपेक्षा आहेत.