- हर्षदा वेदपाठक
🎬 अनेक रिअॅलिटी शोज करत, ठराविक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये झळकणारा गश्मीर महाजनी आता 'छोरी २' या चित्रपटासह सज्ज आहे. चित्रपटाविषयी तो भरभरून बोलतोय.
👮♂️ गश्मीर : मी या चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. साक्षीचा मित्र असलेल्या इन्स्पेक्टर समरची ही भूमिका आहे. ही प्रेमकथा नाही, तर शुद्ध मैत्रीवर आधारित कथा आहे. जेव्हा साक्षीची मुलगी गायब होते, तेव्हा समर तिच्या मदतीला धावून येतो. इथून भयकथेला सुरुवात होते. माझी व्यक्तिरेखा मुख्य नायिकेला मदत करणारी आहे.
गश्मीर : खरे सांगायचे तर, माझे सोहा अली खानबरोबर एकही सीन नव्हते, त्यामुळे मी फक्त नुसरत बरोबरच काम केले. तिच्यासोबत काम करताना मजा आली. ती खूप साधी, सरळ आहे. आम्ही व्यावसायिक कलाकार आहोत. विशेषतः भयपटात गप्पा-गॉसिपसाठी वेळच नसतो.
गश्मीर : होय. भारतातील हॉरर चित्रपटांचा इतिहास इतर देशांइतका जुना नाही. पण गेल्या काही वर्षांत भयपटांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लोकांना ही शैली आवडतेय. माझ्या मते, हॉरर चित्रपटांचे भविष्य चांगले आहे.
गश्मीर : खूपच छान वाटते. प्रेक्षक याला स्वीकारत आहेत आणि त्यांना ते आवडतंय हे समाधानकारक आहे. 'खतरों के खिलाड़ी' आणि 'झलक' प्रमाणेच माझे काम एवढ्या मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतेय, याचा मला अभिमान वाटतो.
गश्मीर : मी 'हॉटस्टार'वर 'गुनाह' आणि 'अॅमेझॉन एमएक्स'वर 'तू जख्म है' यांसारख्या लॉन्ग फॉर्मेट सीरिज केल्या आहेत. पण त्या मिनी सिरीजसारख्या लोकप्रिय ठरल्या नाहीत. यावर्षी मी मिनी सीरिज करण्याचा विचार करतोय.
गश्मीर : माझ्या मते, मी हे खूप सहजपणे करतो. कोणालाही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत नाही. 'झलक' आणि 'खतरों के खिलाड़ी' हे दोन शो मी केले आणि दोन्हीवेळी मला अशीच प्रतिक्रिया मिळाली.
गश्मीर : मी यावर्षी एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. सध्या प्री-प्रोडक्शनचे काम सुरू आहे. मेच्या शेवटी शूटिंग सुरू करायचे आणि दिवाळीला तो प्रदर्शित करण्याचा विचार आहे.