हत्येचे रहस्य उलगडणार : हाऊसफुल्ल ५
आज प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी घडवून आणणारे अनेक नवीन चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर तसेच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहेत. क्राईम, थ्रिलर, अॅक्शन, साय-फाय, कॉमेडी अशा विविध शैलींचा अनुभव देणारी ही यादी रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
हाऊसफुल्ल ५ । थिएटर्स
'हाऊसफुल्ल' चित्रपट मालिकेतील हा पाचवा चित्रपट आहे. तरुण मानसखुबानी दिग्दर्शित या चित्रपटात एका आलिशान क्रूझवर झालेल्या एका अब्जाधीशच्या खून रहस्यात त्या क्रूझवरील सर्वजण संशयित बनतात. या चित्रपटात अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, सोनम बाजवा, चित्रांगदा सिंह, चंकी पांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
मर्सी फॉर नन । नेटफ्लिक्स
आपल्या लहान भावाच्या गूढ मृत्यूनंतर, एका माजी गँगस्टरला सूडाच्या भावनेने पुन्हा अंडरवर्ल्डच्या जगात प्रवेश करतो. या ॲक्शन-पॅक कोरियन ड्रामामध्ये सो जी सेब, हुह जून हो, आणि अहं किल कांग प्रमुख भूमिकेत आहेत.
गेट अवे । जीओ हॉस्टार
निक फ्रॉस्ट, आइस्लिंग बी, सेबॅस्टियन क्रॉफ्ट आणि मैसी एरेस अभिनीत, हा चित्रपट एका कुटुंबाची कथा आहे. ज्यांची स्वप्नवत सुट्टी एका भयानक वळण घेतले. जेव्हा त्यांना समजते की ते ज्या बेटावर सुट्टीसाठी गेले आहेत तिथे एक सीरियल किलर राहतो.
के.ओ. । नेटफ्लिक्स
एका बॉक्सिंगच्या सामन्यात एका बॉक्सरचा मृत्यू होता. तेव्हा एक माजी फायटर त्याच्या विधवेला मदत करायची ठरवता. मात्र तो स्वत: गुन्हेगारी दुनियेत अडकतो.
छल कपट: द डिसेप्शन । झी ५
एका डेस्टिनेशन वेडिंग दरम्यान एका प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा मृतदेह आढळतो. तेव्हा एक प्रतिभावान पोलीस अधिकारी त्यामागील सत्य शोधण्यासाठी मिशनवर निघते. या क्राईम थ्रिलरमध्ये श्रिया पिळगावकर, काम्या अहलावत, रागिनी द्विवेदी आणि इतर अनेक कलाकार आहेत.
द लाईफ ऑफ चक । थिएटर्स
हा साय-फाय चित्रपट स्टीफन किंगच्या २०२० च्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. कथा चार्ल्स क्रान्त्झ नावाच्या एका सामान्य माणसाच्या तीन अध्यायांवर केंद्रित आहे. या चित्रपटात टॉम हिडलस्टन, चिवेटेल इजिओफोर, कॅरेन गिलन, जेकब ट्रेम्बले आणि मार्क हॅमिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
प्रिडेटर: किलर ऑफ किलर्स। जीओ हॉटस्टार
हा एक अँथॉलॉजी चित्रपट आहे, जो मानवी इतिहासातील तीन सर्वात क्रूर योद्ध्यांवर आधारीत आहे. एक वायकिंग रेडर, सामंती जपानमधील एक निन्जा आणि द्वितीय महायुद्धातील एक पायलट यांची कथा सांगतो.
स्ट्रॉ । नेटफ्लिक्स
टायलर पेरीने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा थ्रिलर चित्रपट एका सिंगल मदरच्या जीवनात आधारीत आहे. जिच्या जीवनात दुर्दैवी घटना घडत राहतात. ज्यामुळे शेवटी ती निराश होऊन एक धक्कादायक निर्णय घेते. या चित्रपटात ताराजी पी हेन्सन, शेरी शेफर्ड, आणि टेयाना टेलर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
द फोनिशियन स्कीम । थिएटर्स
ही झ्सा-झ्ना कोर्डा नावाच्या एका श्रीमंत उद्योगपतीची कथा आहे. जो आपल्या एकुलत्या एका मुलीला आपल्या साम्राज्याचा एकमेव वारसदार घोषित केल्यानंतर एका नवीन उद्योगात उतरतो. मात्र, हे दोघे लवकरच प्रभावशाली टायकून, दहशतवादी आणि मारेकऱ्यांचे लक्ष्य बनतात.