ओटीटीवर काय पहाल?

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
27th June, 12:20 am
ओटीटीवर काय पहाल?

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ओटीटीवर अनेक चित्रपट आणि मालिका झळकल्या. त्यात काही मोजकेच चित्रपट आणि मालिका आहेत. ज्यांना प्रेक्षक अधिकाधिक प्रेम देत आहेत.


केसरी चॅप्टर २ । जिओ हॉटस्टार
अक्षय कुमार, आर माधवन आणि अनन्या पांडे स्टारर ‘केसरी चॅप्टर २’ हा चित्रपट या वर्षी १८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी केली नाही, परंतु जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित त्याची कथा लोकांना आवडली. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर येत आहे.


राणा नायडू सीझन २ । नेटफ्लिक्स
साउथचा सुपरस्टार राणा दग्गुबाती आणि वेंकटेश यांची ही क्राइम ड्रामा सीरिज ‘राणा नायडू’ची कहाणी आता पुढे सरकणार आहे. राणा त्याचे वडील तुरुंगातून सुटल्यानंतर गुन्हेगारी आणि कौटुंबिक नाटकात कसा अडकतो, हे यात दाखवले आहे. त्याच वेळी अर्जुन रामपाल आणि कृती खरबंदा या सीरिजमध्ये नवीन ट्विस्ट जोडतात.


पदक्कलम । जिओ हॉटस्टार
‘पदक्कलम’ हा एक मल्याळम अलौकिक कॅम्पस कॉमेडी चित्रपट आहे. ही चार मित्रांची कथा आहे. जेव्हा त्यांना कळते की त्यांच्या कॉलेजमधील प्राध्यापकाकडे सुपरपॉवर आहे आणि तो त्याचा वापर चुकीच्या मार्गाने करत आहे. हा चित्रपट १० जून रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.


अलप्पुझा जिमखाना । सोनी लिव्ह
ही कथा आहे तरुण खेळाडूंच्या एका गटाची, जे कॉलेजच्या स्पोर्ट्स कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी बॉक्सिंग स्वीकारतात. मात्र, जेव्हा ते उच्च दर्जाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होतात, तेव्हा गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होतात.


किंग्ज ऑफ जो'बर्ग (सीझन ३) । नेटफ्लिक्स
ही कथा व्हेरोनिका मसिरेची आहे. जी आपल्या कुटुंबाच्या गुन्हेगारी साम्राज्याची सूत्रे हातात घेते. मात्र तिला समजते की आपल्या कुटुंबाला एक शाप देण्यात आलेला आहे. तेव्हा ती त्याचा सामना करण्याचा निर्णय घेतले.


शुभम । जिओ हॉटस्टार
समंथा रुथ प्रभू हिच्या निर्मिती बॅनरखाली बनलेला हा सिनेमा, भिमाली येथील केबल ऑपरेटर श्रीनूची कथा आहे; त्याची पत्नी दररोज रात्री ९ वाजता एक मालिका बघून विचित्र वागू लागते. तिच्यासोबत गावातील इतर महिलाही तशाच वागतात. श्रीनू आणि त्याचे मित्र या मागचे रहस्य शोधण्यासाठी मोहिमेवर निघतात.


द प्रॉसिक्युटर । लायन्सगेट प्ले
डॉनी येन दिग्दर्शित आणि प्रमुख भूमिकेत असलेला, हा चित्रपट २०१६ च्या हाँगकाँगमधील ड्रग ट्रॅफिकिंग प्रकरणावर आधारित आहे. एक माजी सरकारी वकिल भ्रष्ट यंत्रणेतील सत्य उघड करत एका निरपराध व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि स्वत: संकटात अडकतो.

हेही वाचा