आज कोण कोणते चित्रपट, मालिका झळकणार ओटीटी, चित्रपटगृहात...वाचा!

खुनाचा गुंता सोडवणार ‘डिटेक्टिव शेरदिल’

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
20th June 2025, 12:35 am
आज कोण कोणते चित्रपट, मालिका झळकणार ओटीटी, चित्रपटगृहात...वाचा!

लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर थरार, कॉमेडी, ड्रामा आणि अ‍ॅनिमेशनसह विविध प्रकारचे मनोरंजन आजपासून पाहायला मिळणार आहे. तसेच आमिर खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट सितारे जमीन पर आज थिएटरमध्ये झळकणार आहे.


डेटेक्टिव शेरदिल । झी५
दिलजीत दोसांझ या चित्रपटात एका नवशिक्या पण उत्साही डिटेक्टिव्हची भूमिका साकारत अाहे. तो श्रीमंत उद्योगपती पंकज भट्टीच्या हत्येचा तपास करत असतो. या चित्रपटात डाएना पेंटी, बोमन इराणी, चंकी पांडे, बनिता संधू आणि सुमीत व्यास यांच्याही भूमिका आहेत.


सितारे जमीन पर । थिएटर्स
हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटात आमिर खान एका बास्केटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत, ज्याला निलंबित केल्यानंतर न्यूरो-डेव्हलपमेंटल डिफरन्स असलेल्या व्यक्तींना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी दिली जाते. ही कथा त्यांच्या संघर्षांची, जिद्दीची आणि आत्मविश्वासाच्या पुनर्निर्मितीची आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना यांनी केले असून चित्रपटात आमिर खान, जेनेलिया देशमुख, दर्शील सफारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


ग्राउंड झिरो । अमेझॉन प्राइम व्हिडिओ
इमरान हाश्मी अभिनीत हा थरारपट बीएसएफ अधिकारी नरेंद्रनाथ दुबे यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी दहशतवादी घाझी बाबाला पकडण्यासाठी दोन वर्षे मोहिम चालविली होती. या चित्रपटात सई ताम्हणकर आणि झोया हुसेन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.


ओलिंपो । नेटफ्लिक्स
स्पेनमधील एका उच्च दर्जाच्या क्रीडा प्रशिक्षण केंद्रात घडणारी ही मालिका आहे. यात तरुण खेळाडू त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील संघर्षांना सामोरे जाताना दिसतात आणि स्वत:ला स्पर्धेसाठी तयार करतात.


फाउंड – सीझन २ । जिओहॉटस्टार
गॅब्रिएल मोझली नावाची पीआर स्पेशालिस्ट हरवलेल्या आणि दुर्लक्षित लोकांना शोधण्याचे काम करते. या प्रक्रियात्मक नाटकाचा दुसरा हंगाम अधिक गुंतागुंतीचा आणि उत्कंठावर्धक आहे.


के-पॉप डेमन हंटर्स । नेटफ्लिक्स
ही अॅनिमेटेड म्युझिकल फँटसी फिल्म आहे. तीन के-पॉप सुपरस्टार्स रुमी, मीरा आणि झोई त्यांच्या गुप्त शक्तींच्या साहाय्याने त्यांच्या चाहत्यांना अमानवी संकटांपासून वाचवतात.


सेमी-सुटर । नेटफ्लिक्स
ही हलकीफुलकी विनोदी फिल्म आहे. जॅकी आणि जेपी हे जोडपे एका बेबी ब्रँडच्या प्रेझेंटेशनसाठी ‘आदर्श पालक’ असल्याचे नाटक करतात आणि मग सुरू होतो गोंधळाचा खेळ.


प्रिन्स अँड फॅमिली । झी५
एक अंतर्मुख युवक प्रिन्स, जो ब्रायडल बुटीक चालवतो आणि चित्रू राणी या बिनधास्त मुलीशी लग्न करतो आणि त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलते. ही एक कौटुंबिक विनोदी कथा आहे.      

हेही वाचा