एप्रिलमध्ये पडद्यावर मेगाशो; फुले, केसरी-२, द राजा साबसाठी प्रेक्षक उत्सुक

फुले, केसरी-२, द राजा साबसाठी प्रेक्षक उत्सुक एप्रिल २०२५ मध्ये सिनेमा हॉलमध्ये प्रेक्षकांसाठी अनेक मोठ्या आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांची रेलचेल असणार आहे. या महिन्यात केसरी चॅप्टर २ : द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियावाला बाग, फुले, जाट, बझुका, द राजा साब, गुड बॅड अग्ली यांसारख्या बड्या सिनेमांचा समावेश आहे. खास तुमच्यासाठी एप्रिल महिन्यात बॉलीवूड आणि साउथ इंडियन भाषांतील येणाऱ्या प्रमुख सिनेमांची यादी आम्ही तयार केली आहे. चला तर मग, जाणून घेऊया कोणते चित्रपट येत आहेत या महिन्यात…

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
10th April, 07:01 pm

🎬 केसरी चॅप्टर २

अक्षयकुमारच्या 'केसरी २' मधून जलियांवाला बाग हत्याकांडावर आधारित एक वेगळी कथा उलगडली जाणार आहे. यामध्ये अक्षय कुमार एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या टीझरमुळे चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

📅 रिलीज डेट : १८ एप्रिल

🌟 कलाकार : अक्षय कुमार, आर. माधवन, अनन्या पांडे

🗣️ भाषा : हिंदी

📚 फुले

हा चित्रपट थोर समाजसुधारक ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंचा संघर्ष आणि कार्य मांडण्यात आले आहे.

📅 रिलीज डेट : ११ एप्रिल

🌟 कलाकार : प्रतीक गांधी, पत्रलेखा

🗣️ भाषा : हिंदी

🦁 'महा अवतार नरसिंह'

'महा अवतार नरसिंह' ही भक्ती आणि आशेची कथा आहे, जी भक्त प्रल्हादच्या दृष्टिकोनातून मांडलेली आहे. या चित्रपटात भगवान विष्णूंच्या नरसिंह अवतारामार्फत वाईटाचा अंत आणि मानवतेची पुनर्स्थापना दाखवण्यात आली आहे. निर्मात्यांच्या मते, ही अनोखी संकल्पना अॅनिमेटेड स्वरूपात मांडणे हेच सर्वाधिक प्रभावी माध्यम ठरेल.

🌟 कलाकार : रॉबर्ट पॅटिन्सन, नाओमी अॅकी, मार्क रफॅलो

🗣️ भाषा: कन्नड, मल्याळम, तामिळ, तेलुगू, हिंदी

🌡️ २८ डिग्री सेल्सिअस

हा एक रोमँटिक सस्पेन्स थ्रिलर आहे, जो अंजली नावाच्या मुलीवर आधारित आहे. अंजली मेंदूच्या दुखापतीमुळे अतिउष्णतेसाठी अतिसंवेदनशील झालेली आहे. तिचे जगणे २९ डिग्री सेल्सिअस या स्थिर तापमानातच शक्य आहे. कार्तिक तिचे रक्षण करण्यासाठी धडपडतो आणि या प्रवासात अनेक अनपेक्षित घटनांचा उलगडा होतो.

📅 रिलीज डेट : ४ एप्रिल

🌟 कलाकार : नवीन चंद्रा, शालिनी वाडनिकट्टी, विवा हर्षा

🗣️ भाषा: तेलुगू

💥 जाट

'गदर २'नंतर सनी देओल पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकला आहे. त्याचा चित्रपट 'जाट' १० एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा खलनायकाच्या भूमिकेत आहेत. सनी देओलचे चाहते या सिनेमासाठी खूप उत्सुक आहेत.

📅 रिलीज डेट : १० एप्रिल

🌟 कलाकार : सनी देओल, रणदीप हुड्डा, विनीत कुमार, प्रशांत बजाज

🗣️ भाषा : हिंदी

👻 द राजा साब

'द राजा साब' ही मारुती दिग्दर्शित फिल्म भय आणि विनोदाचा एक भन्नाट संगम घेऊन येते. प्रभास या सिनेमात एका अशा व्यक्तीची भूमिका साकारत आहेत, ज्याला वडिलांची संपत्ती हवी असते, पण तो लवकरच जाणतो की त्याच्यावर एका शापित आत्म्याचा प्रभाव आहे.

📅 रिलीज डेट : १० एप्रिल

🌟 कलाकार : प्रभास, निधी अग्रवाल, मालविका मोहनन

🗣️ भाषा: तेलुगू, कन्नड, तामिळ, हिंदी

👻 द भूतनी

संजय दत्त याची हॉरर फिल्म 'भूतनी' १८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत मौनी रॉय आणि सनी सिंग झळकणार आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या टीझरमध्ये मौनी रॉयचा भितीदायक लुक पाहायला मिळतोय, जो चाहत्यांना खूपच आकर्षित करत आहे.

📅 रिलीज डेट : १८ एप्रिल

🌟 कलाकार : संजय दत्त, मौनी रॉय, सनी सिंग, पलक तिवारी

🗣️ भाषा : हिंदी

🕉️ कन्नपा

'कन्नप्पा' ही कथा एका नास्तिक शिकाऱ्याची आहे, जो आपल्या अतूट श्रद्धेमुळे भगवान शिवाचा कट्टर भक्त बनतो. चित्रपटात कन्नप्पा आपल्या श्रद्धेमुळे दोन्ही डोळे काढून भगवान शिवाला अर्पण करतो. ही गोष्ट मनाला चटका लावणारी आहे.

📅 रिलीज डेट : २५ एप्रिल

🌟 कलाकार : विष्णू मांचू, प्रभास, मोहन बाबू, मोहनलाल, अक्षय कुमार

🗣️ भाषा : तेलुगू, हिंदी, कन्नड, मल्याळम, तामिळ