साहित्य :
मधून ४ बाजूने चिरलेली वांगी
३ बारीक चिरलेले कांदे
१ वाटी भाजलेले शेंगदाण्याचे कूट
अर्धा चमचा किसलेला लसूण
१ मोठा चमचा कांदा लसूण मसाला
१ मोठा चमचा लाल तिखट
चवीनुसार मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :
प्रथम एका भांड्यात तीन बारीक चिरलेले कांदे, एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा किसलेला लसूण, एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला, एक मोठा चमचा लाल तिखट व चवीनुसार मीठ घ्या. मग या मिश्रणात थोडं पाणी घाला व घट्टसर असं करून घ्या जेणेकरून वांग्यामध्ये आपल्याला भरता येईल. आता वांगी घ्या व हे मिश्रण वांग्याच्या मधोमध घाला. आता एका कढईत तेल तापत ठेवा तेल तापलं की त्यात वांगी भरून झाल्यानंतर जे मिश्रण उरतं ते मिश्रण या तेलात घाला व दोन ते तीन मिनिटं भाजून घ्या. आता यात भरलेले वांगी टाका व दोन ते तीन मिनिटं शिजवून घ्या. मग यात गरम पाणी घाला व दहा ते पंधरा मिनिटं मंद गॅसवर वांगी शिजवून घ्या. छान एकत्र करा. अशा प्रकारे चमचमीत वांगी मसाला तयार आहे. तुम्ही भाकरी केव्हा चपातीबरोबर खाऊ शकता.
संचिता केळकर