उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात आरोग्यमंत्र्यांनी आकस्मित भेट देत केली पाहणी
पणजी : आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात आकस्मित भेट देत तेथील सुविधा व उपचारांची पाहणी केली. पाहणी अंती कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी रुग्णालयात सेवा बजावणाऱ्या दोन चालक व एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
रूग्णांशी संवाद साधून त्यांनी येथे दिल्या जाणाऱ्या सेवेची माहिती घेतली. डॉक्टर्स तसेच परिचारिकांशी संवाद साधताना त्यांनी आरोग्यसेवेत आवश्यक असलेल्या सुविधांची माहिती घेतली. दरम्यान आपल्या कामात तसेच रूग्णांच्या सेवेत हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यापुढे कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी आजच्या कारवाईद्वारे दिला आहे.
बातमी अपडेट होत आहे.