अनेक ठिकाणी जाणवतेय पाण्याची वानवा
पणजी : राज्यात सध्या उकाड्याने थैमान घातले आहे. वातावरण बदलामुळे हिवताप, अशक्तपणा, उष्माघाताचा त्रास देखील जाणवू लागला आहे. एरव्ही मार्चच्या मध्यापर्यंत जाणवणारे उन्हाचे चटके फेब्रुवारीतच गोवेकरांच्या अंगाची लाही लाही करत आहे. एसी, कूलर, पंखे यांच्या खरेदीसाठी लोक बाजारपेठेकडे वळत आहे. दरम्यान एका आकडेवारीनुसार दरवर्षी राज्यात विजेच्या वापरात १० टक्के या हिशेबाने वाढ होत असल्याने याचा वीज खात्याच्या कार्यप्रणालीवर देखील परिणाम दिसून येत आहे.
विजेची वाढती मागणी पुरवणे हे विजखात्यासाठी आव्हानात्मक ठरत आहे. यामुळे विविध भागात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होण्याच्या तक्रारीत देखील वाढ झाली आहे. गोव्याच्या वीज खात्याकडे वीज तयार करण्यासाठी लागणारी स्वतःची अशी यंत्रणा नाही. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी वीज खरेदी केली जाते. याचे अनेक तोटे देखील राज्याला क्षण करावे लागतात. गेल्यावर्षी विजेची एकंदरीत मागणी ही ८५० मेगा वॉट इतकी होती. दरम्यान सध्याचा उन्हाचा वाढता पारा पाहता येत्या काळात विजेची मागणी ही अजून १० टक्क्यांनी वाढणार आहे. तरी, सौरऊर्जेच्या वापरासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे वीज विभागावरील भार कमी होण्याची थोडीफार अपेक्षा आहे.
पणजी-पर्वरीसह अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई
सध्या उत्तर आणि दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्याच्या तक्रारी देखील समरो येत आहेत. अनेक जण सोशल मिडियावर याबाबतची माहिती शेअर करत आहेत. दरम्यान पणजीत स्मार्ट सिटीच्या कामामुळे, अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे. गेल्या काही सिवसांत कंत्राटदार आणि कामगारांच्या नजरचुकीने पिण्याच्या पाण्याची वाहिनी देखील फुटली आहे. याचा परिमाण पणजीत असलेल्या विविध वसाहती आणि घरांना जाणवत आहे.
बातमी अपडेट होत आहे.