मांद्रे पोलिसांची कारवाई
धिरयोत विजेता ठरलेला बैल.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे : मांद्रे पंचायत क्षेत्रात बेकायदेशीररीत्या धिरयो आयोजित केल्याबद्दल मांद्रे पोलिसांनी आरिफ मुल्ला व ऋग्वेद नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पेडणे तालुक्यातील हरमल, मांद्रे, कोरगाव भागात अधूनमधून कायद्याने बंदी असलेल्या धिरयोचे आयोजन केले जाते. त्यासाठी लाखो रुपयांच्या पैजा लावल्या जातात. रविवारी पहाटे मांद्रे येथे धिरयो, म्हणजेच बैलांच्या झुंजीची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या बैलाच्या मालकाला १८ लाख रुपये बक्षीसस्वरूपात देण्यात आले. धिरयो आयोजनाची माहिती पोलिसांना कळताच मांद्रे पोलिसांनी ऋग्वेद नाईक आणि आरिफ मुल्ला या आयोजकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. पोलीस पुढील तपास करत आहेत.