कोलवाळ कारागृहात कैदी अझीझवर हल्ला

हल्लेखोर कैद्याचे नाव उघड करण्यास अझीझचा नकार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th February, 04:14 pm
कोलवाळ कारागृहात कैदी अझीझवर हल्ला

म्हापसा : अट्टल चोरटा असलेला अंडर ट्राईल कैदी अझीझ अस्लाम आसिफ (कर्नाटक) याच्यावर एका कैद्याकडून पेनच्या सहाय्याने हल्ला केला. यात अझीझच्या डोळ्याला व हाताला जखम झाली आहे.

ही घटना सोमवारी रात्री कोलवाळ कारागृहात घडली. अझीझ झोपेत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. घटनेनंतर त्याला कारागृहातून म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान डॉक्टरांनी अझीझवर उपचार करून त्याला पुन्हा कारागृहात पाठवले आहे.

अद्याप जखमी अझीझने हल्लेखोर कैद्याचे नाव उघड केलेले नाही. कारागृह प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. दरम्यान, यापूर्वी कारागृहात असताना कैदी अझीझ याने २०२२ मध्ये गजेंद्र सिंग या कैद्यावर ब्लेड सारख्या धारदार हत्याराने हल्ला केला होता.

हेही वाचा