‘हिसाब बराबर’सह चित्रपट, मालिकांची ओटीटीवर मेजवानी

स्काय फोर्स आज​ चित्रपटगृहात झळकणार

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
24th January, 12:23 am
‘हिसाब बराबर’सह चित्रपट, मालिकांची ओटीटीवर मेजवानी

ओटीटी व चित्रपटगृहात या आठवड्यात अनेक चित्रपट व सीरिज प्रदर्शित होणार आहेत. या या यादीत बहुचर्चित ‘हिसाब बराबर’व अक्षय कुमारच्या देशभक्तीवर आधारीत चित्रपट ‘स्काय फोर्स’चा समावेश आहे.


हिसाब बराबर । झी ५

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुक झालेला आर माधवनचा ‘हिसाब बराबर’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. हा एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे, जो हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक आणि घोटाळ्यावर आधारित आहे. या चित्रपटात आर माधवन व नील नितीन मुकेश, कीर्ती कुल्हारी, रश्मी देसाई आणि अनिल पांडे यांच्या भूमिका आहेत.


स्काय फोर्स । ​थिएटर्स

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अक्षय कुमारचा देशभक्तीवर आधारीत चित्रपट ‘स्काय फोर्स’ आज प्रदर्शित होत आहे. ही कथा हवाई दलाच्या पायलट अज्जमदा बोप्पय्या देवय्या यांची, जे एक धाडसी पायलट होते. १९६५ च्या युद्धात ते बेपत्ता झाले होते. त्यांचे काय झाले, त्याच्या शौर्याची कहाणी देशासमोर कशी आली, त्यांनी एका साध्या लढाऊ विमानाने पाकिस्तानची आधुनिक लढाऊ विमाने कशी नष्ट केली, हे आपल्याला चित्रपटात पहायला मिळेल. या चित्रपटात अक्षय कुमारसह वीर पहाडिया, सारा अली खान, निम्रत कौर यांच्या प्रमूख भूमिका आहेत.

स्वीट ड्रिम्स । डिस्ने+ हॉटस्टार
‘स्वीट ड्रीम्स’ ही केनी आणि दिया या दोन अनोळखी व्यक्तींची कथा आहे, जे खऱ्या आयुष्यात कधीही भेटले नाहीत. पण ते स्वप्नात एकमेकांना पाहतात. ही विचित्र घटना त्यांना एकमेकांना शोधण्यास भाग पाडते, जी पुढे एका जादुई प्रेमकथेत बदलते. या चित्रपटात अमोल पराशर व मिथिला पालकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


द नाईट एजंट सीझन २ । नेटफ्लिक्स
स्पाय-अ‍ॅक्शन-थ्रिलर ‘द नाईट एजंट’चा दुसरा सीझन दाखल झाला आहे. या सस्पेन्स, थ्रिलर सीरिजमध्ये ब्रिटनी स्नो, बर्टो कोलन, लुईस हर्थम आणि टेडी सियर्स यांच्याही भूमिका आहेत. ही सीरिज मॅथ्यू क्विर्क यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.


हार्लेम सीझन ३ । अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
‘हार्लेम’ या वेब सीरिजचा तिसरा सीझन ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा या सीरिजचा शेवटचा सीझन आहे.


द ट्रॉमा कोड : हिरोज ऑन कॉल । नेटफ्लिक्स
साऊथ कोरियन सीरिज ‘द ट्रॉमा कोड: हीरोज ऑन कॉल’ ही मेडिकल ड्रामा आपल्याला नेटफ्लिक्सवर पाहता येईल. यात ऑपरेशन थ‍िएटर व सर्जन्सचे जग दाखवण्यात आले आहे.


शाफ्टेड । नेटफ्लिक्सद 
‘शाफ्टेड’ ही स्पॅनिश कॉमेडी सीरिज ‘अल्फा मेल्स’ची फ्रेंच रिमेक आहे. ही कथा चार मध्यमवयीन मित्रांभोवती फिरते जे पॅरिसच्या आधुनिक जगात अनेक समस्यांचा सामना करत आहेत.


सँड कॅसल । नेटफ्लिक्स
‘द सँड कॅसल’ हा एक लेबनीज थ्रिलर चित्रपट आहे. ही कथा कुटुंबाची आहे. या कुटुंबात चार लोक आहेत. नादिन लाबाकी, झियाद बाकरी, झैन अल रफीया आणि रॅमन अल रफीया. ते चौघेही जगापासून दूर एका वेगळ्या बेटावर अडकतात आणि जगण्यासाठी संघर्ष करतात. तिथे त्यांना अनेक भयंकर संकटांचा सामना करावा लागतो.