पॅराग्लायडिंग करताना मृत पावलेल्या दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

शेखर रायजादा यांना पाच दिवस पोलीस कोठडी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
पॅराग्लायडिंग करताना मृत पावलेल्या दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

पेडणे : केरी समुद्रकिनारी पठारावर पॅराग्लायडिंग करत असताना पुणे येथील शिवानी दाभळे आणि सुमन नेपाळी या दोघांना मरण आल्यानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तर, बेकायदेशीर पॅराग्लायडिंग व्यवसाय करणाऱ्या शेखर राय जादा यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.

पुणे येथील शिवानी दाभाडे ही युवती आयटी क्षेत्रात काम करत असल्याची माहिती उपलब्ध झाली. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी केरी समुद्रकिनारी दि. १८ रोजी ती आपल्या मित्रासोबत आली होती. त्यावेळी त्याच दिवशी सायंकाळी साडेचार वाजता केरी डोंगर पठारावर बेकायदेशीर पॅराग्लायडिंग करणाऱ्या व्यवसायिकाशी त्यांचा संपर्क आला. त्या ठिकाणी पॅराग्लायडिंग करण्यासाठी ती गेली होती. त्यावेळी तिला पायलट सुमन नेपाळी यांनी पॅराग्लायडिंगमध्ये बसवले आणि तो तिला घेऊन गेला. काही वेळातच पॅराग्लायडिंगची एक दोरी तुटली गेली आणि त्यानंतर अपघात होऊन डोंगरावर दोघेही आपटले. त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. ​दि. २० रोजी शिवानी दाभडे हिचा मृतदेह नातेवाईकांनी पुणे या ठिकाणी नेला.

बेकायदेशीर पॅराग्लायडिंग करून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले पॅराग्लायडिंग व्यावसायिक शेखर राय जादा यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. 

हेही वाचा