आसगावात मार्बल ग्रॅनाईट अंगावर कोसळून कामगार ठार

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
16th January, 12:02 am
आसगावात मार्बल ग्रॅनाईट अंगावर कोसळून कामगार ठार

म्हापसा : आसगाव येथील एका बांधकामस्थळी गाडीतून मार्बल ग्रॅनाईट उतरवत असताना अंगावर कोसळून त्याखाली चिरडल्याने एस.के. मीर हुसेन (२८, रा. पश्चिम बंगाल) हा कामगार ठार झाला असून तिघे जखमी झाले.

जखमींमध्ये शेख इस्माईल, शिवदास चौधरी व अली राजा (सर्व रा. पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. त्यातील दोघांवर उपचार सुरू आहेत. तर, एकाला डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणी मौजिद्दिन अली (४६, रा. पश्चिम बंगाल) यास हणजूण पोलिसांनी अटक करून नंतर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.

ही घटना आसगावमधील वीन नामक बांधकामस्थळी मंगळवारी १४ रोजी पहाटे ४.३० वा. घडली होती. राजस्थानमधून आलेल्या ट्रकमधील मार्बल ग्रॅनाईट उतरवत होते. तेव्हा चारही कामगारांच्या अंगावर मार्बल ग्रॅनाईट कोसळले. त्यामुळे त्याखाली ते चिरडले गेले. इतर कामगारांनी त्यांना बाहेर काढले व म्हापसा येथे जिल्हा इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी एस.के. मीर हुसेन याला मृत घोषित केले.

याप्रकरणी पोलीस हवालदार विशाल गावस यांच्या तक्रारीच्या आधारे हणजूण पोलिसांनी संशयित सुपरवायझर विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. नंतर म्हापसा न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विराज नाईक हे करीत आहेत. 

हेही वाचा