मडगावात चिकनचा कचरा नाल्यात; टेम्पोचालक फातोर्डा पोलिसांच्या ताब्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18 hours ago
मडगावात चिकनचा कचरा नाल्यात; टेम्पोचालक फातोर्डा पोलिसांच्या ताब्यात

मडगाव : मडगाव रिंगरोडवर चिकनचा कचरा नाल्यात टाकताना टेम्पोचालकाला नागरिकांनी पकडले. फातोर्डा पोलिसांकडून संशयित सुनील पुजारी याला ताब्यात घेण्यात आले.
मडगाव रिंगरोडवर चिकनचा व इतर मांसाचा कचरा नाल्यात टाकताना नागरिकांकडून गाडी चालकाला पकडण्यात आले आहे. त्यानंतर फातोर्डा पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांकडून सदर वाहनाची पाहणी करण्यात आली व टेम्पोचालक सुनील पुजारी याची चौकशी करण्यात आली.
चालक पुजारी याने दिलेल्या माहितीनुसार, एसजीपीडीए मार्केटमधील चिकनचा कचरा गाडीतून आणून नाल्यात टाकण्यात आला होता. पालिकेकडून कचरा उचल केली जात नसल्याने चिकन, मटनाचा उर्वरित कचरा पाण्यात टाकतो. माशांना खाद्य मिळावे याच उद्देशाने चिकनचा कचरा नाल्याच्या पाण्यात टाकला. याआधी खारेबांध परिसरात कचरा टाकल्याचे त्याने सांगितले. फातोर्डा पोलिसांकडून संशयित पुजारी याला ताब्यात घेण्यात आले.            

हेही वाचा