पणजी : ३० दिवसांच्या आत मुदत संपलेल्या परवान्यांचे नूतनीकरण करा

गोवा मेडिकल कौन्सिलकडून सर्व संलग्नीत डॉक्टरांना आदेश

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th January, 04:16 pm
पणजी : ३० दिवसांच्या आत मुदत संपलेल्या परवान्यांचे नूतनीकरण करा

पणजी : गोवा मेडिकल कौन्सिलने गुरुवारी एक अधिसूचना जारी केली.  गोवा मेडिकल कौन्सिलशी संलग्न असलेले सर्व डॉक्टर्सना (ज्यांच्या परवान्याची मुदत ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपली आहे अशा सर्व डॉक्टर्सना) त्यांच्या परवान्यांचे ३० दिवसांच्या आत नूतनीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

गोवा मेडिकल कौन्सिलच्या रजिस्ट्रारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, दिलेल्या वेळेत डॉक्टर्स आपल्या मुदत संपलेल्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात अपयशी ठरल्यास त्यांची गोवा मेडिकल कौन्सिल कायदा, १९९१ चे कलम कलम २३  आणि नियम ६१ तसेच डिसेंबर २०२४  रोजी झालेल्या कौन्सिलच्या सर्वसाधारण बैठकीत मंजूर झालेल्या ठरावानुसार. नोंदणी रद्द करण्यात येईल. 



हेही वाचा