कळंगुटमधील पाच आस्थापने एफडीएकडून बंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st December 2024, 11:46 pm
कळंगुटमधील पाच आस्थापने एफडीएकडून बंद

कळंगुट येथील एका आस्थापनावर एफडीएकडून टाकलेली छापेमारी.

म्हापसा : कळंगुट येथे अस्वच्छ परिसरात कार्यरत असलेली पाच खाद्य आस्थापने अन्न व औषधे प्रशासनाने (एफडीए) बंद केली. यामध्ये केजीएन बिर्याणी, हंडी बिर्याणी, अफलातून, अल अकबर रेस्टॉरंट, जायका रेस्टॉरंट या कारवाई केलेल्या आस्थापनांचा समावेश आहे.
अन्न व औषधे प्रशासनाने कळंगुट पंचायत क्षेत्रातील अस्वच्छ स्थितीत चालणारी तसेच बेकायदा व्यवसाय करणाऱ्या बिर्याणी व इतर आस्थापनांविरुद्ध गेल्या आठवड्यापासून मोहीम सुरू केली होती. मंगळवारी या कारवाईअंतर्गत वरील आस्थापने बंद करण्यात आली.
या आस्थापनांमधून पंचायतीच्या मदतीने खाद्यपदार्थांसह ३८ भांडी जप्त करण्यात आली. शिवाय ३०० किलो बिर्याणी, ५० किलो बीफ खिमा, २०० किलो चिकन ग्रेव्ही, २०० किलो भाजलेला कांदा अशा खाद्यपदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच अस्वच्छ स्थितीत कच्च्या कोंबडीचा पुरवठा करणाऱ्या एका विक्रेत्याला पकडून १०० किलो कच्च्या चिकनची देखील विल्हेवाट लावण्यात आली. अन्न व औषधे प्रशासनाचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी राजाराम पाटील, अमित मांद्रेकर व सहकारी पथकाने ही कारवाई केली.                 

हेही वाचा