नवी दिल्ली : सरकार शिधापत्रिकाधारकांना कमी दरात किंवा मोफत रेशन पुरवते. मात्र केंद्राने रेशनसंदर्भातील नियमांत अमूलाग्र बदल केले आहेत. आता या लोकांना रेशन घेण्यासाठी रेशन कार्ड दाखवण्याची गरज भासणार नाही. यासाठी सरकारने डिजिटल पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला असून, प्रगत तंत्रप्रणाली विकसित करत सरकारने रेशन मिळवण्यासाठी एक ॲप लाँच केले आहे. MERA RATION 2.0 हे ॲप वापरून तुम्ही तुमचा रेशन मिळवू शकता.
भारत सरकार त्यांच्या अख्यतारीत असलेल्या सरकारी आणि निमसरकारी विभागांतील सर्व यंतणा डिजिटल करण्यासासाठी प्रयत्नरत आहे. याच अनुषंगाने रेशनकार्डचे नियम बदलण्यात आले आहे. केंद्र सरकार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वस्त दरात रेशन पुरवते. आतापर्यंत या लोकांना रेशन मिळवण्यासाठी रेशनकार्ड दाखवावे लागत होते. मात्र आता रेशनकार्ड कालबाह्य ठरवून MERA RATION 2.0 ॲपद्वारे सरकार रेशनचे वितरण करणार आहे.
१) यासाठी सर्वप्रथम हे ॲप डाउनलोड करा
२) तुम्ही Google Play Store किंवा Apple Store वरून MERA RATION 2.0 ॲप डाउनलोड करू शकता.
३) मेरा राशन २.० ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आधार क्रमांक, फोन नंबर यासारखी आवश्यक माहिती भरा.
४) OTP पडताळणीसाठी, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा.
५) यानंतर तुमच्या रेशन कार्डची डिजिटल प्रत उघडेल. ही प्रत स्वस्त धान्य दुकानात दाखवून तुम्ही रेशन सहज मिळू शकेल.
सरकार केवळ पात्र लोकांनाच कमी दरात किंवा मोफत अन्नधान्य पुरवते. शिधापत्रिकेसाठी पात्रतेच्या अटी काय आहेत हे जाणून घ्या?१) अर्जदाराचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
२) गावातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा कमी आणि शहरांमध्ये वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
३) कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.
४) कुटुंबाकडे कार किंवा अन्य चारचाकी वाहन नसावे.
५) जर पेन्शन मिळत असेल तर ते १० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
६) जे आयकर भरतात ते रेशनकार्डसाठी पात्र नाहीत.
७) ज्या व्यक्तीकडे १०० चौरस मीटरपेक्षा जास्त जमीन आहे ती देखील रेशनकार्डसाठी पात्र नाही.
या डिजिटल ॲपनंतर रेशनकार्ड फिजिकली बाळगण्याची गरज संपुष्टात येईल. सरकारने डिजिटल रेशन कार्ड बनवण्याची प्रक्रियाही सोपी केली आहे, जी आता तुम्ही घरी बसून करू शकता. हे बदल रेशनकार्ड धारकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.