दिल्ली : निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
दिल्ली : निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला

दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी निलंबित आयएएस आधिकारी पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. पूजावर यूपीएससी परीक्षेत फसवणूक केल्याचा आणि ओबीसी तसेच दिव्यांग कोट्याचा बेकायदेशीररीत्या  लाभ घेतल्याचा आरोप आहे.

यूपीएससीच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर विरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल केला होता. अटक टाळण्यासाठी पूजाने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती चंदर धारी सिंह यांच्या खंडपीठाने २७  नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर या प्रकरणी निर्णय राखून ठेवला होता. यापूर्वी १  ऑगस्ट रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने पूजाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. पूजावरील आरोप गंभीर असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. 

पूजा पुण्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत होती. यावेळी त्यांनी सुविधांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चेंबरवर कब्जा केल्याची तक्रारही समोर आली आहे. तसेच वैयक्तिक ऑडी कारमध्ये लाल दिवा आणि 'महाराष्ट्र सरकार'ची प्लेट लावली.

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजाविरोधात तक्रार केली होती, त्यानंतर तिची वाशिम येथे बदली करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली असता तिने यूपीएससीमध्ये निवड होण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे आढळून आले. तपासात पुढे जात असताना अनेक धक्कादायक खुलासे झाले होते.


हेही वाचा