गुन्हे वार्ता : अखेर गोवा पोलिसांनी केरळमधून आवळल्या सिद्दिकी सुलेमान खानच्या मुसक्या

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
गुन्हे वार्ता : अखेर गोवा पोलिसांनी केरळमधून आवळल्या सिद्दिकी सुलेमान खानच्या मुसक्या

पणजी : क्राईम ब्रांचच्या कोठडीतून पलायन केलेल्या जमीन हडप प्रकरणातील आरोपी सिद्दिकी सुलेमान खानला गोवा पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी केरळ पोलिसांच्या कारवाईनंतर गोवा पोलिसांच्या पथकाने त्याला केरळमधून ताब्यात घेतले होते. दरम्यान केरळ पोलिसांकडून हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गोवा पोलीस त्याला रीतसर अटक करून गोव्यात आणतील.  




दरम्यान पोलीस अधीक्षक (गुन्हे ) राहुल गुप्ता, उपअधीक्षक राजेश कुमार आणि सूरज हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर, निनाद देऊलकर, नितीन हळर्णकर आणि गोवा पोलिसांच्या इतर पथकाने केरळ पोलिसांचा मदतीने कारवाई केली 



दरम्यान आज सकाळीच सिद्दिकी सुलेमान खानचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर पुन्हा व्हायरल झाला होता. त्याने व्हिडीओ जारी करत ॲड अमित पालेकरने आपल्याला सत्ताधारी राजकारण्यांची नावे घेऊन व्हिडिओ करण्यास सांगितले व नंतर ते आपल्याला हवे तसे एडीट करून व्हायरल केले असे म्हटले आहे. दरम्यान कॉन्स्टेबल अमित नाईकशी मैत्री करून त्याच्या मदतीने पलायन केल्याची कबुलीही त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.


बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा