सेंट झेवियर्स कॉलेज इंटर कॉलेजिएट पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन

रोझरी कॉलेज नावेलीला उपविजेतेपद : केडेन फर्नांडिस ‘स्ट्राँगेस्ट मॅन’

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
22nd December, 11:52 pm
सेंट झेवियर्स कॉलेज इंटर कॉलेजिएट पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन

पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत विजेतेपद पटकावलेला सेंट झेवियर्स कॉलेज, म्हापसाचा संघ.
पणजी :
गोवा विद्यापीठाने ज्युबिली हॉल, ताळगाव पठार येथे १६ ते २० डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे विजेतेपद सेंट झेवियर्स कॉलेज, म्हापसाने पटकावले. उपविजेतेपद रोझरी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, नावेली आणि तिसरे स्थान डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, फातोर्डा, मडगाव आणि ज्ञानप्रसारक मंडळाचे कॉलेज आणि रिसर्च सेंटर, आसगाव यांनी पटकावले.
रोझरी कॉलेज, नावेलीच्या केडेन फर्नांडिस याने ‘स्ट्राँगेस्ट मॅन ऑफ गोवा युनिव्हर्सिटी’ हा किताब पटकावला. केडेन फर्नांडिसचे वजन ६४.४ किलोग्रॅम होते आणि स्क्वॅट्स, बेंच प्रेस आणि डेड लिफ्टमध्ये त्याची एकूण कामगिरी ५५५ किलो होती.
उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे सिल्वेस्टर डायस, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा महाविद्यालयाचे संचालक, ॲग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाईन, असागाव, तसेच बालचंद्र बी. जादर, सहाय्यक, गोवा विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक उपस्थित होते. त्यांनी विजेत्यांना चषक आणि पदके प्रदान केली.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :
५९ किलो आणि त्यावरील :
प्रथम : अल्टोन आल्मेडा (श्री दामोदर कॉलेज, मडगाव), द्वितीय : देवदत्त गावडे (गोवा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, फार्मगुडी), तृतीय : संस्कार कुंकळ्ळेकर (सरकारी कॉलेज खांडोळा).
६६ किलो आणि त्यावरील : प्रथम : कायडेन फर्नांडिस (रोझरी कॉलेज, नावली), द्वितीय :महेश मुझुमदार (सेंट झेवियर्स कॉलेज, म्हापसा), तृतीय : नॅथन रेबेलो (डॉन बॉस्को अभियांत्रिकी, फातोर्डा)
७४ किलो आणि त्यावरील : प्रथम : साईसिद्धांत नाईक (जी.आर. करे कॉलेज ऑफ लॉ, मडगाव), द्वितीय : येशूली रॉड्रिग्ज (रोझरी कॉलेज, नावेली) तृतीय : समर्थ भोसले (एमईएस कॉलेज, झुआरीनगर).
८३ किलाे आणि त्यावरील : प्रथम : भास्कर गेन (डीबीसीई, फातोर्डा), द्वितीय :रिसबर्न फर्नांडिस (पीसीसीई कॉलेज, वेर्णा, तृतीय : वेदांत मोरजे (सेंट झेवियर्स कॉलेज, म्हापसा).
९३ किलो आणि त्यावरील : प्रथम : चेतन कांबळी (एस.एस. धेम्पो कॉलेज, कुजिरा), द्वितीय : बेक ब्रॅड (सेंट झेवियर्स कॉलेज, म्हापसा), तृतीय : स्वयं नाईक (व्ही. एम. साळगावकर कॉलेज ऑफ लॉ)
१०५ किलो आणि त्यावरील : प्रथम : आर्यन सातार्डेकर (एनसीआर, डीएमसीआर, आसगाव), द्वितीय : वॉल्डन डिसोझा (जीईसी फार्मगुडी), तृतीय : अलरिच डिकॉस्टा (सेंट झेवियर्स कॉलेज, म्हापसा).
१२० किलो आणि त्यावरील : प्रथम : साईश शेटकर (सेंट झेवियर्स कॉलेज, म्हापसा), द्वितीय :यज्ञदत्त पागी (व्ही.एम. साळगावकर हॉस्पिटॅलिटी), तृतीय : यश गाड (डीएमसीआर आसगाव).
१२० किलोपेक्षा जास्त : प्रथम : अनिश चोडणकर (श्रीदोरा काकुलो कॉलेज, म्हापसा, द्वितीय : वेन मिरांडा (रोझरी कॉलेज, नावेली)