नवी दिल्ली : गाबा येथे खेळवल्या जाणाऱ्या तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. सततच्या पावसाच्या व्यत्ययादरम्यान, काल आकाशदीप आणि जसप्रीत बूमराहच्या झुंझार खेळीमुळे भारताने फॉलोऑनचा फास टाळला. आज भारताने ऑस्ट्रेलियाचे ७ फलंदाज बाद केले व यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला डाव घोषित केला. दरम्यान भारताने बिनबाद ८ धाव केल्यानंतर टी-ब्रेक घेण्यात आला. यावेळी पुन्हा पावसाचा व्यत्यय आला. यांनंतर खेळ झाला नाही व तिसरी कसोटी अनिर्णित ठरली.
दरम्यान, रोहित शर्मासोबत आलेल्या रविचंद्रन अश्विनने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. भारताच्या या दिग्गज फिरकीपटूच्या निवृत्तीमुळे भारतीय संघात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. अश्विनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल सांगायचे झाल्यास त्याने १०६ कसोटी सामन्यांमध्ये ५३७ विकेट घेतल्या आहेत, यासोबतच त्याने ११६ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५६ विकेट घेतल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ११ वेळा मालिकावीर होण्याचा विक्रम अश्विनच्या नावावर आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा जगातील ७ वा गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे कसोटीत ५३७ विकेट्स आहेत. विशेष म्हणजे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात पाच किवा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी ३७ वेळा केली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात शेपूट वळवळल्याने गाबामध्ये पराभव टाळण्यातभारतीय संघाला यश आले. आता दोन्ही संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरीत आहेत.