सरसांगण सुपर सीरिज क्रिकेट स्पर्धा
पणजी : आर्लेम क्रिकेट मैदानावर आयोजित सरसांगण सुपर सीरिज क्रिकेट २०२४-२५ च्या ६व्या दिवशी अल्ट्राकॉन मडगाव रॉयल्स आणि प्रायोरिटी टायटन्सने विजय नोंदवला
पहिला सामना अल्ट्राकॉन मडगाव रॉयल्स विरुद्ध एमएलटी क्रिकेट क्लब यांच्यात झाला.अल्ट्राकॉन मडगाव रॉयल्सने एमएलटी क्रिकेट क्लबवर ७ गडी आणि १७ चेंडू राखून विजय मिळवला. मडगाव रॉयल्सने नाणेफेक जिंकूनप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. एमएलटी क्रिकेट क्लबने २० षटकांत ९ बाद १४७ धावा केल्या. कर्णधार ॲड. सचिन सरदेसाईने २१ चेंडूत ३५ अच्युत नाईक दलाल ३२ धावा आणि नित्य कुंकळ्ळीकरने २३ धावांचे योगदान दिले. अल्ट्राकॉन मडगाव रॉयल्सतर्फे कार्तिक हट्टंगडी, सिद्धेश देसाई, रोहन ऑडी, मेघ नेत्रावळकर आणि निकित नाईक दलाल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. कोसांबे याने ४ धावांत २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अल्ट्राकॉन मडगाव रॉयल्स संघाने हा सामना १७.१ षटकांत ७ गडी राखून जिंकला. कर्णधार दामोदर पै पाटणेकर २५ चेंडूत ३६, आणि निकित नाईक दलाल ३३ चेंडूत ३५, मेघ नेत्रावळकरने ३० धावांचे योगदान दिले. एमएलटी क्रिकेट क्लबतर्फे नित्य कुंकळ्ळीकरने १५ धावांत २ आणि खंवटे शेणवीने २५ धावांत १ गडी बाद केला. निकित नाईक दलालला सामनावीर, सचिन सरदेसाईला बेस्ट बॅटर आणि साईल कोसांबेला - बेस्ट बॉलरचा पुरस्कार देण्यात आला.
दुसरा सामन्यात प्रायॉरिटी टायटन्सने १०८ डिलाइट टायटन्सचा २७ धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना प्रायॉरिटी टायटन्सने २० षटकांत ३ बाद १९५ धावा केल्या. सलामीवीर साहिश महांब्रेने २८ चेंडूत ३८, देवल करमालीने १५ चेंडूत ३७, रावजी काकोडकरने 38 आणि अनिमेश प्रभुगावकरने २९ धावांचे योगदान दिले. १०८ डिलाइट टायटन्सकडून कृष्णकांत हेगडे देसाई, अमोघ आगशीकर आणि अभिजीत भंडारे हे यशस्वी गोलंदाज होते.प्रत्युत्तरात, १०८ डिलाइट टायटन्सचा संघ २० षटकांत ७ बाद १६८ धावाच करू शकला. निखिल विर्जिनकरने २९ चेंडूत ३७ आणि अविनाश कोसांबे २८ चेंडूत ३६ धावांचे योगदान दिले. प्रायोरिटी टायटन्सने हा सामना २७ धावांनी जिंकला. ग्रंथिक बुयाओने २५ धावांत २ आणि नीलेश प्रभुदेसाईने ६ धावांत १ गडी बाद केला. अनिमेश प्रभुगावकरला सामनावीर, देवल करमालीला सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि ग्रंथिक बुयाओला सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून पारितोषिक देण्यात आले.