डर्बन : दक्षिण आफ्रिका, डर्बन येथे नुकत्याच झालेल्या अकराव्या काॅमनवेल्थ कराटे चँपियनशीप मधे भारतीय संघाने लंडन, ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाला हरवत २१ सुवर्णपदकांसह निर्विवाद विजय मिळवला आहे.
भारतीय कराटे संघातील वरिष्ठ युवती गटातील शिरोडा गोव्याच्या भुवनेश्वरी संगीता सुरेश जाधव हिने कुमिते प्रकारात सुवर्णपदक जिंकले असून सांघिक प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. तिला नॅशनल कोच कीर्तन कोंड्रू यांचे मार्गदर्शन व ट्रेडिशनल कराटे असोसिएशन ऑफ गोवा चे सचिव जोसेफ राॅड्रिग्ज यांचे सहकार्य लाभले आहे. केंद्रिय राज्य ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, क्रीडा मंत्री गोविंद गावडे, आमदार सुभाष शिरोडकर, शिरोडा सरपंच पल्लवी मेघश्याम शिरोडकर यांनी भुवनेश्वरीचे कौतुक केले आहे.