छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे बीएससीच्या एका विद्यार्थ्याचा परीक्षेदरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बीएससीच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी सिद्धांत मासाळचा शुक्रवारी सकाळी परीक्षा केंद्रात परीक्षेदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यूपीएससीची तयारी करणारा सिद्धांत हा बीड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी होता.
पेपर लिहीत असताना त्याने आपल्या छातीत दुखत असल्याची तक्रार पर्यवेक्षकांकडेही केली होती अशी माहिती समोर आली आहे. यावेळी पर्यवेक्षकांनी सदर शाळेच्या मुख्याध्यपकांना यांची माहिती दिली. त्यांनी एनसीसीच्या पथकासमवेत वर्गात धाव घेतली. चेस्ट कॉम्प्रेशन दिल्या नंतर सिद्धांत मासाळ याला थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सिद्धांत मासाळ याला त्याच्या छोट्या भावाने परीक्षा केंद्रात सोडले होते. वाटेत येताना सिद्धांतला कोणताही त्रास जाणवला नाही तसेच त्यालला कोणतीही आरोग्य विषयक समस्या नव्हती असे तो म्हणाला. दरम्यान, सिद्धांतच्या हृदयात रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला. शवविच्छेदन पूर्ण करून त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.