अमेरिका : मावळते राष्ट्राध्यक्ष बायडेनचा मोठा निर्णय: ४ भारतीयांसह १५०० कैद्यांची शिक्षा माफ

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th December, 03:06 pm
अमेरिका :  मावळते राष्ट्राध्यक्ष बायडेनचा मोठा निर्णय: ४ भारतीयांसह १५०० कैद्यांची शिक्षा माफ

वॉशिंग्टन :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी तब्बल १५०० कैद्यांची शिक्षा माफ केली आहे. यात चार भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे. गुन्हेगारांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे. या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा पुरेपूर अधिकार आहे असे बायडेन म्हणाले. 

अमली पदार्थांच्या प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्यांना दिलासा

अध्यक्ष बायडेन यांनी विशेषत: अमली पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्यां तब्बल ३९ लोकांना माफी दिली आहे. अमेरिकेत अलीकडच्या काळात एका दिवसात मंजूर झालेली ही सर्वात मोठी माफी आहे. आपले आयुष्य पुन्हा रुळावर आणण्याची संधी क्वचितच लाभते, लोकांनी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करावे, असेही बायडेन म्हणाले. 

 भारतीय वंशाच्या चार नागरिकांना कर्जमाफी 

दरम्यान ज्या कैद्यांची शिक्षा माफ झाली आहे त्यात चार भारतीय वंशाच्या नागरिकांची नावे समाविष्ट आहेत. यामध्ये मीरा सचदेवा, बाबूभाई पटेल, कृष्णा मोटे आणि विक्रम दत्ता यांचा समावेश आहे. मीरा सचदेवा हिला २०१२ मध्ये फसवणूकीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. तिला २० वर्षांचा तुरुंगवास आणि ८२ दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला.  बिडेन यांचे हे पाऊल अमेरिकन भारतीय समुदायात चर्चेचा विषय ठरला आहे.  याआधी बायडेन यांनी त्यांचा मुलगा हंटर बायडेनची शिक्षाही माफ केली होती. हंटरवर करचोरी आणि बेकायदेशीररित्या  शस्त्रे बाळगल्याचा आरोप होता.  हंटरला केवळ त्याचा मुलगा असल्यामुळेच लक्ष्य करण्यात आले असे यावेळी ते म्हणाले होते. 

दरम्यान समोर आलेल्या एका धक्कादायक माहितीनुसार; प्रभावशाली एटर्नीज् चा समावेश असलेल्या एका राजकीय गटाने  बायडेन  प्रशासनावर फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना अभयदान द्यावे म्हणून दबाव आणला आहे. याचप्रमाणे, २०२१ मध्ये कॅपिटल हिल हिंसाचारात सहभागी असलेल्या लोकांची शिक्षा माफ करण्याचाही बायडेन प्रशासन विचार करत आहे.  

हेही वाचा