अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये मृतदेह सापडला. पोलिसांकडून आत्महत्येचा प्राथमिक संशय, मात्र विविध अंगांनी याप्रकरणाचा तपास सुरू
सॅन फ्रान्सिस्को : अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील एआय रिसर्चर सुचीर बालाजी हे २६ नोव्हेंबर रोजी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आले. मूळ भारतीय वंशाच्या २६ वर्षीय सुचीरने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान पोलिसांना आतापर्यंतच्या तपासात कोणत्याही अनुचित प्रकार घडल्याचे दृष्टीस पडलेले नाही. तरी विविध अंगाने तपास सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे २६ नोव्हेंबरची ही घटना आज १४ डिसेंबरला उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार नोव्हेंबर २०२० ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत ओपनएआयवर साठी काम करणाऱ्या सुचीरने कंपनीवर अनेक धक्कादायक आरोप केले होते. ओपनएआयचे बिझनेस मॉडेल स्थिर नाही आणि इंटरनेट इकोसिस्टमवर त्याचा येणाऱ्या काळात विपरीत परिणाम होण्याची डाट शक्यता असल्याचे त्याने न्यू यॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
याच बरोबर ओपनएआयने आपला बेस प्रोग्राम विकसित करण्यासाठी ऑनलाइन डेटा कॉपी करून यूएस कॉपीराइट नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप सुचीरने केला होता. तसेच त्याने OpenAIमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कंपनी सोडण्यास सांगितले होते.
या वृत्तावर इलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोण आहेत सुचिर बालाजी?
सुचिर बालाजी यांनी कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठात संगणक विज्ञानाचा अभ्यास केला आणि एआय स्केल करण्यासाठी ओपनएआयमध्ये इंटर्नशिप केले. २०२० मध्ये ओपनएआयवरसाठी काम करणाऱ्या बर्कले विद्यापीठातील सुमारे १२० पदवीधरांपैकी त्यांचा समावेश होता.
न्यूयॉर्क टाइम्सनुसार, बालाजीने २०२० च्या सुरुवातीला GPT-4 नावाच्या नवीन प्रकल्पासाठी डेटा गोळा करण्यास सुरुवात केली. २०२० च्या उत्तरार्धात, कंपनी आपला प्रोग्राम विकसित करत असताना यूएस कॉपीराइट कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचे त्याच्या लक्षात आले.
दरम्यान, २०१५ मध्ये ChatGPT-Maker शोधण्यात मदत करताना त्यांच्या दोघांत झालेल्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप मस्कने ओपनएआयवरच्या सॅम ऑल्टमनसह यांच्यासह इतरांवर केला. मस्क यांनी २०१८ मध्ये याच कारणांसाठी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. मस्कने नंतर ओपनएआयवर आणि सॅम ऑल्टमनसह कंपनीतील इतर अनेक लोकांवर खटला भरला.
मस्कने दाखल केलेल्या खटल्यात ओपनएआयचे सह-संस्थापक ग्रेग ब्रोकमन यांच्यासमवेत ओपन सोर्स, नॉन-प्रॉफिट कंपनी स्थापन करण्यासाठी मस्कशी संपर्क साधला होता, असे म्हटले होते. ही कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विकसित करते. मुळात ही कंपनी ना नफा तत्वावर उभी करण्यात आली होती. ओपनएआयने नफा कमावण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे हा करार रद्द करण्यात आला असे मस्कच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते. यानंतर ओपनएआयवरने मायक्रोसॉफ्टशी करार केला.